हनुमान पतसंस्थेच्या अध्यक्षपदी विशाल पऱ्हाड
चाकण, ता.३ : कडाचीवाडी (ता. खेड) येथील हनुमान ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी विशाल बाळासाहेब पऱ्हाड यांची तर उपाध्यक्षपदी शांताराम श्रीपती खांडेभराड यांची बिनविरोध निवड झाली आहे, अशी माहिती सहकारी संस्थांचे निवडणूक निर्णय अधिकारी सुभद्रा बगाटे, संस्थेचे संस्थापक जयवंत कड यांनी दिली.
पऱ्हाड व खांडेभराड यांचेच अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज आले. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. यावेळी संस्थेचे माजी अध्यक्ष, संचालक पांडुरंग लष्करे, जयवंत कड, उद्धव कड, किरण झिंजुरके, राजेंद्र कड, सुरेश सोनवणे, साधना कड, बेबी कोतवाल, मल्हारी कड, किशोर झिंजुरके, श्रीकांत कड तसेच बाळासाहेब पऱ्हाड, मनोज खांडेभराड आदी उपस्थित होते. निवडीनंतर अध्यक्ष उपाध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला.
10264, 10265
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

