चाकणमधील बेपत्ता मुलचा लोणावळ्यात शोध

चाकणमधील बेपत्ता मुलचा लोणावळ्यात शोध

Published on

चाकण, ता. ४ : नाणेकरवाडी (ता. खेड) येथून बेपत्ता झालेला ११ वर्षाचा चौथीत शिकणारा मुलगा घरातून निघून गेला होता. लोणावळा येथे तो फिरताना आढळला. त्यानंतर एका व्यक्तीने त्याला पोलिस ठाण्यात नेले. चाकण पोलिसांनी त्याला लोणावळा येथून आणून त्याच्या वडिलांच्या ताब्यात दिले. राज मुनीलाल यादव असे या अल्पवयीन मुलाचे नाव आहे, अशी माहिती चाकण दक्षिण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय सोळंके, साहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल पाटील यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘‘हे कुटुंब मूळचे बिहारचे असून, सध्या कामानिमित्त नाणेकरवाडी येथे भाड्याच्या खोलीत राहत आहे. राज यादव हा मुलगा रविवारी (ता. १) रात्री साडेआठच्या सुमारास घरातून निघून गेला होता. याबाबत पोलिसात त्याचे वडील मुनीलाल जयराम यादव यांनी फिर्याद दिली होती. मुनीलाल यादव हे मजुरी करतात. पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलिसांनी अनोळखी आरोपीवर गुन्हा दाखल केला होता. पोलिसांच्या पथकाने परिसरातील अनेक सीसीटीव्ही फुटेज तपासले व काही तांत्रिक तपास केला. त्यानंतर समाज माध्यमावरही माहिती दिली. त्यानंतर हा मुलगा लोणावळा येथे असल्याचे समजले. त्यानंतर त्या मुलाला एका व्यक्तीने लोणावळा पोलिस ठाण्यात नेले. चाकण मंगळवारी (ता. ४) पोलिस त्या मुलाला आणण्यासाठी लोणावळ्याला गेले. ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली, साहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल पाटील, पोलिस शिपाई चव्हाण, फापाळे, माटे, आदम, खेडकर यांच्या पथकाने केली व त्या मुलाला ताब्यात घेतले. रात्री नऊच्या सुमारास वडिलांच्या ताब्यात त्या मुलाला देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com