चाकण औद्योगिक वसाहत, बाजारात वाहतूक सुरळीत
चाकण, ता. ५ : राज्यात आज आरटीओच्या ई-चलन प्रणालीविरोधात वाहतूक संघटनांनी आंदोलन पुकारल्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक व्यवस्थेवर काही प्रमाणात परिणाम झाल्याचे दिसून आले. तर काही ठिकाणी परिणाम जाणवला नाही. राज्यातील ट्रक, टेम्पो, मालवाहतूक गाड्या, बस ,काही प्रवासी वाहतूकदार, रिक्षाचालक, मालक यांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. काही संघटना आंदोलनात सहभागी झाल्या तर काही संघटना सहभागी झाल्या नसल्याने चाकण औद्योगिक वसाहतीत तसेच चाकण परिसरात मालवाहतूक, प्रवासी वाहतूक सुरळीत सुरू होती.
ई-चलन प्रणालीमुळे लहान चुकांवरही दंड आकारले जात आहेत. अनेक वेळा तांत्रिक अडचणींमुळे चुकीचे चलनही निघते. त्यामुळे चालक, मालकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. वाहतूकदारांनी सरकारकडे ई-चलन नियमांमध्ये सुधारणा करणे, दंडाची रक्कम कमी करणे, केंद्रीय मोटार वाहन नवीन नियम वाहन चालक व मालकांसाठी अन्यायकारक आहेत या मागण्यासाठी शासनाच्या विरोधात हे आंदोलन करण्यात येत आहे. याबाबत चाकण औद्योगिक वसाहतीतील जोपादेवी ट्रान्सपोर्टचे मालक गणेश बोत्रे, उद्योजक रोहिदास तुपे यांनी सांगितले की,"या आंदोलनामुळे औद्योगिक वसाहतीतील विविध कंपनीतील मालाची ने आण करण्यावर काही परिणाम झाला नाही मालवाहतूक सुरळीत होती. तसेच उदय ट्रान्स्पोर्टचे वामन गरुड यांनी सांगितले की,"चाकण बाजारातील मालवाहतूक सुरळीत होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

