कर वेळेत भरा, कारवाई टाळा
चाकण, ता. ७ : येथील मालमत्ता धारकांनी मालमत्ता व पाणीपट्टी कराचा वेळेवर भरणा करून नगरपरिषदेस सहकार्य करण्याचे आवाहन चाकण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. अंकुश जाधव यांनी केले आहे.
मार्च महिना सुरू झाल्याने चाकण नगरपरिषदेच्या वतीने मालमत्ता व पाणीपट्टी कराच्या २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी थकीत कराच्या वसुलीसाठी विशेष वसुली मोहीम अभियान राबविण्यात येत असून मालमत्ता व पाणीपट्टी कराच्या वसुलीसाठी नगरपरिषदेच्या सर्व विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचे प्रभागानुसार पथक स्थापन करण्यात आले आहे. या पथकाद्वारे विशेष वसुली मोहीम अभियानांतर्गत चाकण शहरातील मालमत्ता व पाणीपट्टी कराची थकबाकी असणाऱ्या मालमत्ता धारकांच्या मालमत्तांचे सोसायटी, शाॅप, दुकानांचे, बँकांचे नळजोड तोडणे, मालमत्ता जप्ती करणे, थकबाकीदारांची नावे वृत्तपत्रात प्रसिद्ध करणे व शहरातील विविध भागात थकबाकीदारांच्या नावांचा फ्लेक्स लावणे अशा प्रकारची कारवाई करण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी मालमत्ताधारकांनी आपल्याकडे असलेल्या मालमत्ता व पाणीपट्टी कराचा वेळेत भरणा करून होणारी संभाव्य कारवाई टाळण्याचे आवाहन मुख्याधिकारी डॉ. अंकुश जाधव यांनी केले आहे. यावेळी कर विभाग प्रमुख सुनील गोर्डे उपस्थित होते,.
सुटीच्या दिवशीही कार्यालय सुरू
नागरिकांना मालमत्ता व पाणीपट्टी कराचा भरणा करण्यासाठी शनिवार, रविवारसह इतर सुट्टीच्या दिवशी सुद्धा नगरपरिषदेचे वसुली विभागाचे कार्यालय सुरू ठेवण्यात आले आहे. शहरातील विविध सहकारी सोसायट्यांमध्ये वसुलीसाठी विशेष कॅम्पचे नियोजन करण्यात आलेले आहे. तरी नागरिकांनी, मालमत्ता धारकांनी या संधीचा लाभ घेऊन आपल्याकडे असणाऱ्या कराचा वेळेत भरणा करण्याचे आवाहन डॉ. अंकुश जाधव यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

