

चाकण, ता. ११ : अमेरिका, इराण आणि इस्राईलमधील युद्धामुळे उद्भवलेल्या गॅसटंचाईचा मोठा फटका चाकणमधील भाजीपाला बाजाराला बसला आहे. व्यावसायिक गॅसअभावी हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबे, खानावळी, कंपनीतील उपाहारगृहे बंद राहण्याची स्थिती निर्माण झाल्याने मागणी घटली असल्याने शेतकरी व व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
खेड तालुक्यातील चाकण येथील महात्मा फुले बाजारपेठेत कांदा, बटाटा, टोमॅटो, कोबी, फुलकोबी, हिरवी मिरची, आणि पालेभाज्यांची मोठी आवक होते. यातील मोठा हिस्सा हॉटेल, रेस्टॉरंट, कंपन्यांतील कॅन्टीन हे या मालाचे प्रमुख ग्राहक आहेत. मात्र, गॅसवितरण ठप्प झाल्याने हे व्यवसाय बंद ठेवण्याची वेळ आली आहे. परिणामी, बाजारात भाजीपाल्याचा साठा वाढून दर मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. आखाती देशांतील निर्यातही थांबल्याने दुहेरी संकट ओढवले आहे. व्यापारी महेंद्र गोरे आणि रवींद्र बोराटे यांनी सांगितले की, भाजीपाला नाशवंत असल्याने तो लवकर विकला न गेल्यास सडण्याची भीती आहे. प्रशासनाने यावर तातडीने तोडगा काढून गॅस पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी शेतकरी आणि व्यापाऱ्यांकडून केली जात आहे. सध्या बाजारातील परिस्थिती सुधारण्यासाठी गॅसटंचाई निवळून हॉटेल व्यवसाय सुरळीत सुरू होणे महत्त्वाचे असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
उत्पादनाचा खर्चही निघणे कठीण
उत्पादनाचा खर्चही निघणे कठीण झाले आहे. वाहतूक आणि मजुरीचा खर्च पाहता शेतकऱ्यांच्या हाती काहीच उरत नाही, अशी व्यथा स्थानिक शेतकऱ्यांनी मांडली.
तज्ज्ञांच्या मते
पर्यायी विक्री मार्ग शोधणे
थेट ग्राहकांना विक्री
ऑनलाइन ऑर्डर
सोसायटी स्तरावर भाजीपाला विक्री
प्रक्रिया उद्योगाकडे वळण्याचे पर्याय
प्रशासनानेही शेतकरी, व्यापाऱ्यांना मदत करण्यासाठी विशेष उपाययोजना करणे आवश्यक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.