अपघातामुळे नाशिक महामार्गावर कोंडी

अपघातामुळे नाशिक महामार्गावर कोंडी

Published on

चाकण, ता. १४ : पुणे-नाशिक महामार्गावर कंटेनर, डंपरच्या अपघातामुळे वाकीफाटा ते शिरोली फाटा दरम्यान तसेच त्यापुढेही अगदी पाच किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.
दुपारच्या उन्हात वाहनांमध्ये अडकून पडलेल्या प्रवाशांचे हाल झाले. दुचाकी चालकांनी दुसरा मार्ग शोधला. तीन तासानंतर वाहतूक सुरळीत झाली. खरपुडी फाट्याजवळ डंपर चालकाचे नियंत्रण सुटल्याने तो दुभाजकावर चढला व विरुद्ध बाजूने येणाऱ्या कंटेनरला धडकला. दोन्ही वाहने बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली, अशी माहिती राजगुरुनगरचे पोलिस निरीक्षक सुभाष चव्हाण, चाकण वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक दीपक साळुंके यांनी दिली. वाहतूक विभागाच्या पोलिस कर्मचाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी वाहतूक सुरळीत केली.
पुणे-नाशिक महामार्गावर वाहतुकीचा मोठ्या प्रमाणात ताण वाढला आहे . खराबवाडी येथेही शनिवारी (ता. १४) सकाळी कंटेनर उलटला होता, त्यामुळे चाकण-तळेगाव मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्ग तसेच पुणे-नाशिक महामार्गावर सातत्याने वाहनांचे अपघात होत आहेत व अवजड वाहने बंद पडत असल्यामुळे सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे स्थानिकांसह प्रवासी वैतागले आहेत. तर बंद पडलेली तसेच अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यासाठी मोठ्या क्रेनची आवश्यकता आहे, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com