चाकण बाजारात हिरवी मिरची कडाडली
चाकण , ता. १५ : येथील (ता. खेड) महात्मा फुले बाजार आवारात आवक घटल्याने हिरव्या मिरचीच्या बाजारभावात मोठी वाढ झाली आहे. घाऊक बाजारात मिरचीला प्रतिकिलो १०० ते १२५ रुपये बाजारभाव मिळाला. किरकोळ बाजारात हा दर १५० ते २०० रुपयांपर्यंत पोहोचल्याने ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत आहे.
चाकण (ता. खेड) येथील महात्मा फुले बाजार आवारात रविवारी (ता.१५) मध्यप्रदेशातून दहा टन हिरव्या वाटाण्याची आवक झाली. घाऊक बाजारात त्यास प्रतिकिलोला ६० रुपये बाजारभाव मिळाला. नव्याने काढणी केलेल्या वीस टन बटाट्याची आवक झाली. कर्नाटक, आंध्रप्रदेश तसेच नागपूरहून हिरव्या मिरच्यांची सुमारे तीस टन आवक झाली. हिरव्या मिरचीचे भाव प्रति किलोला पन्नास रुपयांनी वाढले. राजस्थानातून गाजराची सुमारे वीस टन आवक झाली.
बटाट्याचे बाजारभाव घसरल्याने स्थानिक उत्पादक शेतकरी तसेच परराज्यातील शेतकरी, व्यापारी चिंतेत आहेत. कांद्याची सुमारे बारा हजार क्विंटल आवक झाली. कांद्याला प्रतिकिलोला आठ ते चौदा रुपये भाव मिळाला.
दरम्यान, गवार, हिरवा वाटाणा, राजमा वालाच्या शेंगा, हिरवी मिरची, वालवर, वांगी, भेंडी यांचे भाव किरकोळ बाजारात प्रति किलोला वाढले आहेत. शेवग्याच्या शेंगांना तसेच हिरव्या मिरचीला शंभर ते सव्वाशे रुपये प्रतिकिलोला बाजारभाव मिळाला.
नाशिक, सातारा, अहिल्यानगरहून टोमॅटोची सुमारे तीस टन आवक झाली. त्यास ३०ते ४० रुपये प्रतिकिलोला घाऊक बाजारात मिळाला.
दरम्यान, कोथिंबीर,मेथी, शेपू, पालकच्या सुमारे दोन लाख जुड्यांची आवक झाली. मेथीच्या व कोथिंबिरीच्या एका जुडीला १५ ते २०रुपये भाव मिळाला. शेपू, पालकच्या जुडीला १५ रु भाव मिळाला.
बाजारभाव पुढील प्रमाणे (प्रतिकिलो) : टोमॅटो : ३०-४०, कारली : ३०, दोडका : ४०-५०,भेंडी :५०-६०, गवार : १००-१२०, कोबी : १५, फ्लॉवर : २०-३२, वांगी : ४०, हिरवी मिरची : १००-१२५, दुधी भोपळा : ३०, शेवगा : १२०, ढोबळी मिरची : ५०, चवळी : ३०, हिरवा वाटाणा : ५० -६०, काकडी : ३५, गाजर : २५, आले : ५०.
भावात वाढ झाल्याने ग्राहकांची लूट
बाजारात हिरव्या मिरचीची आवक कमी राहिली त्यामुळे व्यापाऱ्यांनी हिरव्या मिरचीचे घाऊक बाजारातील भाव वाढवले. शेवटी भाव दीडशे रुपये प्रति किलो पर्यंत नेले. किरकोळ बाजारात हिरवी मिरची दोनशे रुपये प्रतिकिलो ने विकली जात होती. बाजारभावात वाढ झाल्याने ग्राहकांची लूट होत होती.
10328
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

