बळी गेल्यानंतरच प्रशासनाला आली जाग
चाकण, ता. २०: शहरात उघड्यावर कचरा टाकून अस्वच्छता पसरवल्याप्रकरणी चाकण नगरपरिषदेने श्रीकरण रामबहादुर परिहार याच्यावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाने ही कठोर पावले उचलली आहेत.
आंबेठाण चौक परिसरात नुकत्याच झालेल्या कुत्र्यांच्या हल्ल्याची दखल घेत मुख्याधिकारी डॉ. अंकुश जाधव यांनी विविध उपाययोजना जाहीर केल्या. या घटनेनंतर संबंधित भागातील कुत्री पकडून त्यांना निवारा केंद्रात हलवण्यात आले आहे. उघड्यावर कचरा टाकल्यामुळेच भटक्या प्राण्यांचा वावर वाढत असल्याचे निदर्शनास आल्याने, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेत कचरा टाकणाऱ्या परिहार याच्यावर १८ तारखेला गुन्हा नोंदवण्यात आला.
नगरपरिषदेने आता हॉटेलचालक आणि मांसविक्रेत्यांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. ज्या ठिकाणी महिलेवर हल्ला झाला, तिथे सीसीटीव्ही कॅमेरे आणि पथदिवे बसवण्यात येत आहेत. वारंवार सूचना देऊनही कचरा टाकणाऱ्या संस्था व व्यक्तींवर यापुढे थेट फौजदारी गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा डॉ. जाधव यांनी दिला आहे. नागरिकांनीही उघड्यावर कचरा न टाकता प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

