युद्धाच्या झळांमुळे बाजारभाव गडगडले

युद्धाच्या झळांमुळे बाजारभाव गडगडले

Published on

चाकण, ता. २२ : येथील खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या महात्मा फुले बाजाराच्या आवारात रविवारी (ता.२२) नागपुरी मिरची आणि कर्नाटकी कैरीची मोठी आवक झाली. युद्धजन्य परिस्थितीमुळे घाऊक बाजारात सर्वभाज्यांचे बाजारभाव गडगडल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. मात्र, दुसरीकडे किरकोळ बाजारात चढ्या दरामुळे ग्राहकांची लूट सुरू आहे.

बाजारात नागपुरातून २० टन हिरवी मिरची आणि कर्नाटकातून १० टन कैरी दाखल झाली. स्थानिक बटाट्याची २० टन आवक झाली. त्यास प्रतिकिलो १० ते १२ रुपये बाजारभाव मिळाल्याने उत्पादक चिंतेत आहेत. कांद्याची आठ हजार क्विंटल आवक होऊन भाव आठ ते १४ रुपयांवर स्थिरावले आहेत. नाशिक, सातारा भागातून ३० टन टोमॅटोची आवक झाली, ज्याला २० ते ३० रुपये बाजारभाव मिळाला.
दरम्यान, कोथिंबीर, मेथीच्या दोन लाख जुड्यांची आवक झाली असून १५ ते २० रुपयांना एक जुडी मिळत आहे.

किरकोळ बाजारात लूट
घाऊक बाजारात बाजारभाव कमी असताना किरकोळ विक्रेते मात्र दुपटीने विक्री आहेत. घाऊक बाजारात ८०-९० रुपये असलेली मिरची किरकोळ बाजारात १५० रुपयांनी विकली जात आहे. गवारही १२५ रुपये किलोवर पोहोचली आहे. किरकोळ बाजारात होणाऱ्या लुटीमुळे सर्वसामान्यांनी संताप व्यक्त केला.

फळभाज्यांचे बाजारभाव पुढील प्रमाणे (प्रतिकिलोचे भाव) : टोमॅटो :२०-३०, कारली - ३०, दोडका - ४०-५०, भेंडी - ५० ते ६०, गवार - ५०-७०, कोबी - १०, फ्लॉवर - १२, वांगी - २५ , हिरवी मिरची - ८०-९०, दुधी भोपळा - १००, शेवगा - ४०, ढोबळी मिरची - ५०, चवळी - ३०, हिरवा वाटाणा - ५०-६०, काकडी - ३५, गाजर- २५, आले - ५०, वालवर - ५०, सुरण - ५०.

10371

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com