चाकणमधील फुटपाथवर अतिक्रमण

चाकणमधील फुटपाथवर अतिक्रमण
Published on

चाकण, ता. ६ : चाकण (ता. खेड) येथील जुन्या पुणे- नाशिक महामार्गावर मच्छी मार्केट ते मार्केट यार्ड दरम्यान सुमारे तीन कोटी रुपये खर्चून बांधलेले फुटपाथ अतिक्रमणधारकांनी व्यापले आहेत. यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून रस्त्यावरून चालावे लागत आहे.
नगरपरिषद हद्दीतील या मार्गाच्या दोन्ही बाजूंना नागरिकांच्या सोयीसाठी चार फूट रुंदीचे फुटपाथ तयार केले आहे. मात्र, स्थानिक दुकानदारांनी या जागांवर स्वतःची दुकाने थाटली असून, काही ठिकाणी पथारीवाल्यांकडून दरमहा १० ते १५ हजार रुपये भाडे वसूल केले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. नगरपरिषदेचे अतिक्रमण विरोधी पथक केवळ नावापुरती कारवाई करते आणि पथक जाताच पुन्हा परिस्थिती ‘जैसे थे’ होते.
याबाबत चाकण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. अंकुश जाधव यांनी सांगितले की, ‘‘लवकरच कडक मोहीम राबवून सर्व अतिक्रमणे हटविली जातील आणि फुटपाथ मोकळे केले जातील.’’

10447

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com