

चाकण, ता. ७ : नगरपरिषदेच्या वतीने सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी राबविण्यात येत असलेल्या विशेष कर वसुली मोहिमेला, महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग यांनी जाहीर केलेल्या ‘अभय योजनेला’ चाकणमधील मिळकतधारकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे. नगरपरिषदेने केलेल्या आवाहनाला दाद देत नागरिकांनी आपला थकीत व चालू कर व शास्ती भरण्यास प्राधान्य दिले असून ३१ मार्च २०२६ पर्यंत शहरात सुमारे नऊ कोटी ८३ लाख रुपयांची विक्रमी मालमत्ता कर वसुली झाली आहे.
नगरपरिषदेने चालू आर्थिक वर्षासाठी एकूण १५ कोटी २० लाख रुपयांची एकूण मागणी निश्चित केली होती. यामध्ये पूर्वीची थकीत मागणी व शास्ती १० कोटी ६६ लाख रुपये, मागील आर्थिक वर्षाची चालू मागणी ४ कोटी ५४ लाख रुपये इतकी होती. प्रशासनाने केलेल्या विशेष वसुली अभियान, योग्य व नियोजनबद्ध पाठपुराव्यामुळे वसुलीचे आकडे समाधानकारक पाहायला मिळत आहेत.
एकूण वसुली : ९ कोटी ८३ लाख रुपये (६४. ६६%)
चालू मागणी वसुली : ८३.१३%
थकीत मागणी वसुली : ५७%
अभय योजनेचा लाभ : थकीत कर भरणाऱ्यांसाठी जाहीर केलेल्या ‘अभय योजने’चा चाकणमधील १,११२ मिळकतधारकांनी लाभ घेतला आहे.
या योजनेअंतर्गत एकूण ४ कोटी ८३ लाख रुपयांच्या शास्तीपैकी (दंड) अंदाजे १ कोटी ५० लाख रुपयांची शास्ती माफ केली आहे. यामुळे अनेक कुटुंबांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. थकीत कराचा बोजा कमी करण्यास मदत झाली आहे.
या मोहिमेसाठी मुख्याधिकारी डॉ. अंकुश जाधव, नगराध्यक्षा मनीषा गोरे, कर अधिकारी सुनील गोरडे, सहाय्यक कर निरीक्षक नेहा कुलकर्णी, वरिष्ठ लिपिक प्रियांका राऊत आदींनी विशेष प्रयत्न केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.