

- हरिदास कड, चाकण
चाकण, ता. १२ : पाच लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या चाकण शहरात नगरपरिषदेचे स्वतःचे उद्यान नाही. कारण शहराचा विकास प्रकल्प अहवाल (डीपीआर) मंजूर झालेला नाही. डीपीआर लाल फितीत अडकला आहे. त्यामुळे शहरात पूर्वी असलेल्या उद्यानाचा वापर नागरिक, लहान मुले, तरुण, तरुणी करत आहेत.
चाकण (ता. खेड) येथे चक्रेश्वर मंदिर परिसरात स्मशानभूमी जवळ उद्यान आहे. हा परिसर चक्रेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टने व ग्रामस्थांच्या सहकार्यातून विकसित केला आहे. त्यामुळे या परिसराला उद्यानाचे स्वरूप आलेले आहे. येथे असलेले पुरातन तळे, चक्रेश्वर मंदिर, जुने वृक्ष, नवीन लागवड केलेले वृक्ष, हिरवळ व केलेला विकास यामुळे अनेकांची पाऊले या उद्यानाकडे वळतात.
दृष्टीक्षेपात
- मुलांसाठीच्या खेळण्याची दुरवस्था
- जॉगिंग ट्रॅकची दुरवस्था
- पिण्याच्या पाण्याची सोय नाही
- स्वच्छतागृहांची उपलब्धता कमी
- नागरिकांना बसण्यासाठी बाकांची कमतरता
- सीसीटीव्ही कॅमेऱ्याची गरज
गैरप्रकाराचा वाढता धोका
चक्रेश्वर मंदिर परिसरात कधी विद्युत पुरवठा सुरळीत असतो तर कधी नाही. त्यामुळे उद्यानात येणाऱ्या नागरिकांना सुरक्षित वाटत नसल्याने गैरप्रकाराचा धोका वाढतो आहे. तळीराम, गर्दूले यांची संख्या येथे मोठ्या प्रमाणात आहे. तरुण-तरुणी, प्रेमी युगल तसेच विवाहित जोडप्यांची संख्या येथे अधिक प्रमाणात आहे. या परिसरात अनेक गैरप्रकार होतात त्याला आळा बसणे गरजेचे आहे. महिलांसाठी, ज्येष्ठांसाठी सुरक्षिततेच्या उपाययोजना नाहीत.
नमो उद्यान योजनेअंतर्गत सुमारे एक कोटी रुपये खर्चाचे राक्षेवाडी येथे नगरपरिषदेच्या जागेत उद्यान करण्यात येणार आहे. त्या कामाबाबत प्रक्रिया सुरू केली आहे. पुढील काही महिन्यात उद्यानाच्या कामाला सुरुवात होणार आहे.
- डॉ. अंकुश जाधव, मुख्याधिकारी, चाकण नगरपरिषद
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.