वाकीतील भैरवनाथ पतसंस्थेत साडेसहा कोटी रुपयांचा अपहार

वाकीतील भैरवनाथ पतसंस्थेत
साडेसहा कोटी रुपयांचा अपहार
Published on

चाकण, ता. १६ : वाकी बुद्रुक (ता. खेड) येथील भैरवनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेत ६ कोटी ५३ लाख ९२ हजार ४२ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी संस्थेचे संचालक व इतर, अशा ३६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. सर्व आरोपी वाकी बुद्रुक येथील राजकीय पदाधिकारी, तसेच ग्रामपंचायतीचे माजी पदाधिकारी व गावातील कार्यकर्ते आहेत.
याबाबत चाकण उत्तर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम यांनी माहिती दिली की, अपहाराचा प्रकार सन २०१३- १४ ते सन २०१७- १८ या कालावधीत घडला. आरोपींनी संगनमत आणि कट रचून स्वतःच्या आर्थिक फायद्याकरता पतसंस्थेचे सोनेतारण कर्ज, मालमत्ता तारण कर्ज, वैयक्तिक कर्ज, जामीनकी कर्ज वाहनतारण कर्ज, ठेव तारण कर्ज, जमा पावत्यांच्या रक्कम रोजकिर्दीस जमा न घेणे, बँकेतून आणलेल्या रोख रक्कम किर्दीस जमा न घेणे, बँक भरणा नावे दर्शविणे मात्र बँकेत जमा नोंद नसणे, बचत ठेव खात्यामधून बोगस सहीने रक्कम काढणे, बोगस खर्च नावे टाकणे, पंतप्रधान गरीब कल्याण योजनेत गुंतवणूक दर्शविणे मात्र संस्था दप्तरी काही पुरावे नसणे, दैनंदिन ठेव कमी शिल्लक असताना जादा रक्कम नावे टाकून हात शिल्लक घटविणे, रोज किर्दीस आरंभी शिल्लक कमी घेणे, आदी प्रकारे खोटी बनावट दस्तऐवज तयार केले. तसेच, ठेवीदारांचा विश्वासघात करून सुमारे ६ कोटी ५३ लाख ९२ हजार ४२ रुपये रक्कमेचा अपहार केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com