निर्यात ठप्प झाल्याने कांदा उत्पादक चिंतेत

निर्यात ठप्प झाल्याने कांदा उत्पादक चिंतेत
Published on

चाकण, ता. १९ : मध्यपूर्व आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे कांद्याची निर्यात पूर्णपणे ठप्प झाली असून, चाकण बाजार समितीत कांद्याचे भाव ८ ते १३ रुपयांपर्यंत खाली आले आहेत. यामुळे उत्पादन खर्चही निघणे कठीण झाल्याने शेतकरी आणि निर्यातदार व्यापारी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत.
चाकण बाजारात रविवारी (ता. १९) १२ हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. मात्र, आखाती देशांतील मागणी घटल्याने देशांतर्गत बाजारात पुरवठा वाढून दरात मोठी घसरण झाली आहे. बियाणे, खते आणि मजुरीचा खर्च वाढलेला असताना मिळणारा भाव अत्यल्प असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. साठवणुकीच्या सोयींअभावी कांदा खराब होत असल्याची भीती गजानन गांडेकर, सुभाष पवळे व हनुमंत गाडे या शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
आखाती देशांत होणारी निर्यात थांबल्याचा थेट फटका स्थानिक बाजारपेठेला बसला आहे. सरकारने तातडीने हमीभाव किंवा अनुदान देऊन निर्यात धोरणात सुसूत्रता आणणे गरजेचे आहे, असे काही व्यापाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, शेतकरी संघटनांनी सरकारने याप्रकरणी तातडीने हस्तक्षेप करून निर्यात पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com