ग्रामविकासात लोकसहभाग महत्वाचा : घनवट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ग्रामविकासात लोकसहभाग महत्वाचा : घनवट
ग्रामविकासात लोकसहभाग महत्वाचा : घनवट

ग्रामविकासात लोकसहभाग महत्वाचा : घनवट

sakal_logo
By

चास, ता.१९ : ''''गावाचा विकास करावयाचा असेल तर लोकसहभाग महत्त्वाचा असतो. शासनाचा विविध योजनांचा लाभ अधिकाधिक नागरिकांनी घेऊन आपल्याबरोबरच गावाचाही विकास साधला पाहिजे,'''' असे स्पष्ट मत शिवसेनेचे (ठाकरे गट) उपतालुका प्रमुख संजय घनवट यांनी व्यक्त केले.

चास ग्रामपंचायतीच्या (ता. खेड) वतीने वसुलीच्या काही ठराविक रक्कम खर्च करण्याचे बंधनकारक असल्याने या अंतर्गत पाच टक्के खर्च हा अपंगांसाठी खर्च करताना सुमारे सतरा लाभार्थींना प्रत्येकी २०५० रुपयांचा धनादेश संजय घनवट यांच्या हस्ते देण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी घनवट होते.
यावेळी माजी सरपंच अनिल टोके, सुनील घनवट, सरपंच विनायक मुळूक, उपसरपंच जावेद इनामदार, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र घाटकर, संदीप ढमढेरे, पूनम रासकर, आशा टोके, सविता रहाणे, सविता टोके, स्वाती गायकवाड, सुनील वाळुंज, ग्रामसेवक शंकर ढोरे, रामभाऊ नाईकरे उपस्थित होते. कार्यक्रमात लाभार्थी विजय घनवट, रोहिणी घनवट, संगीता घाटकर, आरोही राजगुरू, मच्छिंद्र वाळुंज, मधुकर वाळुंज, रूद्र महामुनी, आनंद टोके, बाळासाहेब देवकर, तनया देवकर यासह अन्य लाभार्थींना धनादेशाचे वाटप करण्यात आले.

00632