खेडच्या पश्‍चिम पट्ट्यात भात लागवडीची लगबग

खेडच्या पश्‍चिम पट्ट्यात भात लागवडीची लगबग

चास, ता.११ : खेड तालुक्याच्या पश्चिम पट्यात भातलागवडींना वेग आला आहे. दमदार पाऊस झाल्याने भातखाचरांमध्ये पाणी साचल्याने भात लागवडी करणे सोपे झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त होत आहे.
खेड तालुक्याच्या पश्चिम पट्यात वाडा, तिफनवाडी, वाळद, आव्हाट, खरोशी, धुवोली, मंदोशी, टोकावडे, भोरगिरीसह सर्वच भागात खरीप हंगामात जवळपास सर्वच ठिकाणी भातलागवड केली जाते. सरासरी २००० ते २२०० मिलिमीटर. सरासरी पाऊस पडणाऱ्या तालुक्याच्या या पश्चिम पट्यात ३२०० ते ३३०० हेक्टर क्षेत्रावर भाताच्या लागवडी होत असते. या वर्षी सुरुवातीच्या टप्यात वरुणराजाने हजेरीच लावली नव्हती. त्यामुळे उपलब्ध पाण्यावर भातरोपे तयार करून शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होते. दरम्यान, भातरोपांना कृत्रीमपद्धतीने पाणी देऊन रोपे जगविली. मात्र गेली काही दिवसांपासून दमदार पावसाने आगमन केल्याने भातखाचरात मुबलक प्रणाणात पाणी साचले. यामुळे भात लागवड सुरू झाली.

चारसुत्री लागवडीमुळे उत्पादनात वाढ
भात लागवडींना वेग आल्याने भातखाचरांमध्ये चिखलणीसाठी बैलांच्या ऐवजी ट्रॅक्टरचा वापर मोठ्या प्रमाणात होतो आहे. भाताच्या लागवडीसाठी कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार पारंपरिक लागवडीबरोबरच चारसुत्री भाताची लागवड करण्यासाठी शेतकरी पुढाकार घेत आहे. यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये भाताचे उत्पादन वाढले आहे.

भात हे शेतकऱ्यांचे वर्षाचे पीक असून, यावर वर्षभराचे आर्थिक गणित अवलंबून असते. या वर्षी पाऊस लांबल्याने लागवडींना उशिरा सुरूवात झाली आहे. मात्र चांगला पाऊस झाल्याने लागवडी सर्वत्र सुरू असून चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा आहे.
- विठ्ठल वनघरे, उपसभापती, खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती

01098, 01097

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com