कमान येथे शेततळ्यामुळे मिळणार शाश्‍वत पाणी

कमान येथे शेततळ्यामुळे मिळणार शाश्‍वत पाणी

चास, ता. ६ : कमान (ता. खेड) येथे शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळावे व त्याचबरोबर शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून त्यांचा आर्थिक स्तर उन्नत व्हावा या उद्देशाने सर नेस वाडिया फाउंडेशन व ब्रिटानिया उद्योग समूह यांच्या सामाजिक उपक्रमातून शेततळे खोदण्यात आले. यामुळे ग्रामस्थांना शाश्‍वत पाणी उपलब्ध होणार असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
खेड तालुक्याच्या पश्चिम पट्यात चास कमान धरण व कळमोडी धरण असले तरी उन्हाळ्यात धरणातून आवर्तन वेळेवर न सोडल्यास पिकांना ऐनवेळेस पाणी न मिळाल्याने पिकांपासून मिळणाऱ्या उत्पन्नात मोठी घट येते तसेच पाणीटंचाईही मोठ्या प्रमाणात भेडसावते. त्यामुळे पाणी साठवणे गरजेचे असल्याने शेतकऱ्यांची गरज ओळखून या सामाजिक कामास वाडिया फाउंडेशन व ब्रिटानिया यांच्या माध्यमातून गणेश मधुकर मुळूक यांच्या शेतामध्ये शेततळे तयार करण्यात आले. त्याचा परिसरातील शेतकरी बांधवांना त्याचा लाभ होणार आहे.
दरम्यान, फाउंडेशनच्या कुशाला शेट्टी व त्यांचे सहकारी, सुमेध धुरंधर, प्रणव जगताप तसेच ब्रिटानिया उद्योग समूहाचे डॉक्टर श्याम लोंढे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या कामात आशीर्वाद दूध संकलन केंद्राचे अध्यक्ष मारुती नाईकरे यांनी पाठपुरावा केला. या शेततळ्याच्या लोकार्पण प्रसंगी माजी सरपंच योगेश नाईकरे, मोहकलचे सरपंच नवनाथ राऊत, संदीप नाईकरे, दिलीप बळवंत नाईकरे, सोहम, सिद्धेश, विराज मुळूक उपस्थित होते.

02232

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com