

चास, ता.२ : वाडा (ता. खेड) व परिसरात तसेच खेड तालुक्याच्या पश्चिम पट्यात भाद्रपदी बैलपोळा ऊत्साही, आनंदी वातावरणात हलगी डफड्याच्या तालावर साजरा करण्यात आला, गुलाल व भंडाऱ्याची उधळण करत वाजत गाजत शेतकऱ्यांनी आपल्या सर्जा राजाच्या मिरवणुका वाडा बाजार पेठेतून काढल्या होत्या, मात्र बैलपोळ्यावर लम्पीच्या आजाराचे सावट असल्याने मिरवणुकीत बैलांची संख्या लक्षणीय घटल्याचे चित्र होते.
वाडा गावात पार पडलेल्या मिरवणुकीत शिवसेना जिल्हा संघटक अक्षय जाधव, शिवाजी मोरे, दत्ता राउत, समीर सुपे, सचिन वाडेकर, अक्षय केदारी, अक्षय मुळूक, बंटी हुंडारे, अथर्व उबाळे, नितीन लांडगे, प्रतिक कदम, रवी हुंडारे, सुभाष वाडेकर, विक्रम तनपुरे यांसह अनेक मान्यवरांची उपस्तिती होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.