

चास, ता. ४ : पाडळी- काळेचीवाडी (ता. खेड) येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी कैलास ज्ञानेश्वर काळे, तर उपाध्यक्षपदी मंगल एकनाथ भागडे यांची बिनविरोध निवड झाली.
राजगुरुनगर (ता. खेड) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. यामध्ये अध्यक्षपदासाठी काळे तर उपाध्यक्षपदासाठी भागडे यांचेच अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती एस. एम. बगाटे, तसेच सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून सुजय थिगळे यांनी बिनविरोध निवड जाहीर केली. जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या निवडणुकीवेळी खंडेराव थिगळे, दत्ता सातपुते, दत्तात्रेय सातकर, विलास बालघरे, संतोष सातकर, दगडू भागडे, किसन भागडे, आशा पानसरे, उमेश बारणे, संदीप बालघरे, शशिकांत काळे, सरपंच शीतल सातकर, उपसरपंच माधुरी शिंदे, संपत बालघरे, मुरलीधर भागडे, विशाल शिंदे, विकी सातकर, योगेश पानसरे, दत्ता रोडे, प्रदीप ढोरे, नामदेव बालघरे, वैभव सातकर आदी मान्यवर उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.