शेतकऱ्यांना भात उत्पादनात वाढ होण्याचा विश्वास
चास, ता. ८ : भाताचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात हळवी भातपिके कापणीस तयार झाली आहेत. यंदा दमदार पाऊस झाल्याने भाताची पिके उत्तम आहेत. त्यामुळे मागील काही वर्षांच्या तुलनेत उत्पन्नात चांगली वाढ होईल, असा विश्वास येथील शेतकऱ्यांना आहे.
खेड तालुक्याच्या पश्चिम पट्यात लागवड होणाऱ्या भातपिकामध्ये हळवा आणि गरवा अशा दोन प्रकारात भातलागवड होत असून, हळवा भातपीक लागवडीनंतर साधारण १०० ते १०५ दिवसांत कापणीस येत येतात तर गरवा पिकास सरासरी १२० ते १२५ दिवस कालावधी अपेक्षीत असतो. सद्यःस्थितीत हळवा प्रकारच्या भाताची पिके कापणीसाठी परिपक्व झाली आहेत तर गरवा भाताची पिकेही ओंब्यांनी लगडली आहेत. काही भागात उशिरा लागवड झालेली भातपिकेही ओंब्यानी लगडण्यास सुरुवात झाली आहे.
दरम्यान, गरवा भाताची पिकेही ओंब्यांनी लगडलेली असली तरी या पिकास एका पावसाची गरज असून पाऊस झाल्यास पिके चांगली येतील मात्र पाऊस न झाल्यास गरवा जातीच्या भाताच्या उत्पन्नात मोठा फरक पडणार आहे.
दसरा संपल्यावर भात पिकाच्या कापणीस वेग
चांगल्या पावसामुळे भात पिके उत्तम असून भाताच्या ओंब्या चांगल्या भरीव असल्याने चांगले उत्पन्न मिळणार आहे. पिके कापणीस तयार असली तरी सद्य स्थितीत नवरात्रोत्सवाची धामधूम सुरू असल्याने शेतमजुरांचा व प्रामुख्याने महिला शेतमजुरांचा मोठा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे दसरा संपल्यावरच भात पिकाच्या कापणीस वेग येणार आहे.
02736
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

