

चास, ता. १९ ः वाडा (ता. खेड) येथे खेड तालुक्यासह आंबेगाव तालुक्याच्या सीमेवर वाडा वनविभागाच्या हद्दीत पाण्याचे तळे वन्य प्राण्यांसाठी वरदान ठरत आहे. या वनतळ्यात आजही नैसर्गिक पाणीसाठा शिल्लक असल्याने वन्य प्राण्यांची पाण्याची गरज भागत असल्याने वन्य प्राणी मानवी वस्तीकडे फिरताना दिसत नाहीत. मात्र, कृत्रीम पाणवठे कोरडे असल्याने त्यामध्ये टँकरच्या साहाय्याने पाणी सोडण्याची गरज आहे.
सध्या सर्वत्र कडक उन्हाची तीव्रता जाणवत असून कडक उन्हामुळे वन्य प्राणी प्रामुख्याने पाण्यासाठी मानवी वस्तीकडे फिरकत आहेत. वन्य प्राण्यांच्या जिवासह मानवी वस्तीला धोका निर्माण होतो, ही वस्तुस्थिती आहे. मात्र, वाडा परिसरातील वनविभागाच्या हद्दीत वनविभागाच्या वतीने जंगलांमध्ये पाण्याचे स्रोत दोन ठिकाणी निर्माण करण्यात आलेले आहेत. त्यापैकी नैसर्गिक स्रोत पाण्याने भरलेला असल्याने जंगलातील प्राणी जंगलातच थांबल्याचे चित्र असून दुसरा कृत्रीम पाणीसाठा कोरडा पडला आहे. नैसर्गिक प्रकारचे पाणवठे जंगलांमध्ये सर्वत्र घेतल्यास वन्यप्राण्यांची मानवी वस्तीत घुसखोरी पूर्णपणे थांबून हल्ल्याच्या घटना थांबण्यास मदत होणार आहे. घेण्यात आलेली ही
वनतळी ही दगडामध्ये घेण्यात आल्याने पाण्याचा चांगला स्रोत उपलब्ध झालेला असून साधारण एप्रिल महिन्यापर्यंत या तळ्यांमध्ये पाणी प्राण्यांसाठी उपलब्ध होणार असण्याचे संकेत असून त्यानंतर टँकरच्या साह्याने यामध्ये पाणी सोडण्यात आल्यास वन्यप्राण्यांच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. तूर्त कोरड्या पडलेल्या वनतळ्यात पाणी सोडण्याची गरज आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.