

चास, ता. ८ : चास (ता. खेड) येथील लिंबपेठ सुतार आळी येथे बांधलेल्या श्री गणपती, श्री विठ्ठल रखुमाई व श्री विश्र्वकर्मा मंदिराचा नववा वर्धापन दिन उत्साहात साजरा केला. यावेळी ऋतिकादीदी कदम यांच्या सुश्राव्य कीर्तनाने भाविक मंत्रमुग्ध झाले. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.
चास येथील लिंबपेठ सुतार आळी येथील तरूणांनी एकत्र येत नऊ वर्षांपूर्वी श्री गणपती, श्री विठ्ठल रखुमाई व श्री विश्र्वकर्मा यांचे भव्य मंदिर उभारलेले असून, या मंदिराचा नववा वर्धापन दिन शुक्रवारी (ता. ७) साजरा केला. सकाळी मान्यवरांच्या हस्ते श्रींची अभिषेक व पूजा पार पडल्यावर नेमाचे भजन केले. सायंकाळी हरिपाठ पार झाल्यावर कै. सुरेश गंजाळ यांच्या स्मरणार्थ प्रकाश गंजाळ व दीपक गुंजाळ यांच्या सौजन्यातून ऋतिकादीदी कदम यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम झाला. रात्री कै. ठकूबाई लक्ष्मण कोंढावळे यांच्या स्मरणार्थ प्रकाश लक्ष्मण कोंढावळे व रावजी प्रभाकर बोकड यांच्या वतीने भाविकांना महाप्रसाद दिला. भैरवनाथ प्रासादिक भजन मंडळ गुंजवठा यांच्या वतीने जागर केल्यावर कार्यक्रमाची सांगता झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.