कडधे येथील आगीमध्ये गवताची गंज भस्मसात

कडधे येथील आगीमध्ये गवताची गंज भस्मसात

Published on

चास, ता.२५ : कडधे (ता. खेड) येथील महादेवदरा परिसरातील डोंगराला सोमवारी (ता. २४) अज्ञाताने आग लावली. आगीच्या धगीत डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या जनावरांसाठी साठवून ठेवलेल्या गवताच्या गंज आगीत भस्मसात झाल्या. कडक उन्हात स्थानिक नागरिकांसह वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तत्परता दाखवत आग आटोक्यात आणली. यामुळे पुढील अनर्थ टळला.
कडधे येथील धोंडिबा रामा शिंदे यांनी शेताच्या कडेला पण डोंगराच्या पायथ्यांनी मालकी हक्कात जनावराच्या चाऱ्यासाठी साठवून ठेवलेले गवत आगीत भस्मसात झाले. या बाबत त्यांचा मुलगा आनंद शिंदे यांनी सांगितले की, डोंगरावर अज्ञाताने आग लावली. ती वनविभागाच्या हद्दीत जाऊन पुन्हा मालकी क्षेत्रात पसरली. डोंगराच्या पायथ्याशी आमचे गवत तसेच जनावरांची वैरण त्यामध्ये जळून खाक झाली. आग लागल्याचे लक्षात येताच मी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना संपर्क केला असता वनविभागाचे अंकुश गुट्टे यांसह वनकर्मचारी व स्थानिक नागरिकांच्या मदतीने खासगी क्षेत्रासह वनविभागाच्या हद्दीतील आग नियंत्रणात आणली.
दरम्यान, बिबीचे वनपाल व्ही. पी. कदम यांनी सांगितले की, वनक्षेत्राला लागून असणाऱ्या शेतकऱ्यांनी शेताचा बांध पेटवताना आवश्यक ती काळजी घ्यावी. आग वनक्षेत्रात जाणार नाही याची दक्षता घ्यावी. जर आग वनक्षेत्रात गेली तर कारवाई करण्यात येईल. वनक्षेत्रात आग लावणारांचे नाव वनविभागाला कळविल्यास त्याला वनपरिक्षेत्र स्तरावर योग्य ते बक्षीस दिले जाईल.

03208

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com