खेडच्या पश्र्चिम पट्ट्यात भातलागवडीस प्रारंभ

खेडच्या पश्र्चिम पट्ट्यात भातलागवडीस प्रारंभ

Published on

चास, ता.३ : खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात टोकावडे, वांजाळे, आव्हाट, मोरोशी परिसरात भातलागवडी करण्यास प्रारंभ झाला. दमदार पाऊस व भातखाचरांत पाणी साचून राहिल्याने भातलागवडींस सुरुवात झाली आहे.
गेली काही वर्षांत पहिल्यांदाच कृत्रीम पद्धतीने पाणी न देता भात लागवडी पावसाच्या पाण्यावर वेळेवर होत आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. चालू वर्षी मे महिन्याच्या मध्यंतरीच अवकाळीने दमदारपणे हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांना धुळवाफेवर भाताची पेरणी करणे शक्य झाले नव्हते. त्यातच पेरणीपूर्व मशागतींची कामे रखडली होती. शिवाय जमिनीत वापसा नसल्याने भातरोपे तयार करण्यासाठी साळीच्या पेरण्याही रखडल्या होत्या. मात्र, मध्यंतरी पावसाने उघडीप दिल्याने जमिनीत वापसा होताच शेतकऱ्यांनी साळीच्या पेरण्या केल्या होत्या व हीच भातरोपे लागवडीसाठी तयार झाली आहेत. प्रामुख्याने टोकावडे, वांजाळे, आव्हाट, मोरोशी या भागात भात लागवडींना सुरुवात झाली आहे. भातरोपांची झालेली वाढ व पावसामुळे भातखाचरांमध्ये पाणी साचून असल्याने भात लागवडींना प्रारंभ झाला आहे. याबाबत बोलताना टोकावडे येथील शेतकरी पांडुरंग घिगे यांनी सांगितले, की आमच्या पश्चिम पट्ट्यात खरीप हंगामात भाताचे पीक हे मुख्य असल्याने भाताची लागवड महत्त्वाची व ती वेळेवर होणे गरजेचे असते.
दरम्यान, गेली काही वर्षांपासून भात लागवडीच्या वेळेसच पाऊस दडी मारतो. कृत्रीम पद्धतीने पिकांची लागवड करावी लागते. मात्र, चालू वर्षी पावसाने वेळेपेक्षा आधीच सुरुवात केली असून, भातखाचरांमध्ये पाणीही साचून राहिलेले असल्याने दरवर्षीप्रमाणे कृत्रीम पद्धतीने पाणी देण्याची आवश्यकतच नाही. पावसाने थोडी विश्रांती घेतल्यास रोपांची वाढ जोमाने होऊन भाताच्या लागवडींना वेग येणार असल्याचे घिगे यांनी सांगितले.
03566

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com