फुलांच्या रोपांचे कमानला रोपण

फुलांच्या रोपांचे कमानला रोपण

Published on

चास, ता. ४ : कमान (ता. खेड) येथे वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिनाचे औचित्य साधत वृक्षारोपण करण्यात आले. फुलांची, औषधी तसेच शोभिवंत रोपांची लागवड करण्यात आली
पद्मभूषण वसंतदादा पाटील कृषी महाविद्यालय, आंबी (ता.मावळ) येथील कृषी विभागाच्या विद्यार्थ्यांनी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. यावेळी विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाद्वारे पर्यावरण रक्षणासोबतच कृषी आणि निसर्ग यांच्यातील अतूट नाते विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले. प्रसंगी सरपंच इंदूबाई नाईकरे, उपसरपंच पुष्पा नाईकरे, ग्रामपंचायत सदस्य यांसह ग्रामस्थ हरिभाऊ नाईकरे, सूरज नाईकरे, सुजल नाईकरे, मीरा नाईकरे, अनिता नाईकरे, रंजना नाईकरे यांच्यासह कृषीदूत शुभम गजघाटे, पार्थ कवटकार, ओम देशमुख, राहुल शिरहट्टी, सोहम ढमाल, विवेक भोसले उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक व स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने करण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com