वाडा मंडळात अजूनही कोसळतोय पाऊस

वाडा मंडळात अजूनही कोसळतोय पाऊस

Published on

चास, ता.१० : सततचा कोसळणार पाऊस... उन्हाळी पिकांची काढणी ठप्प... पेरण्या करता येईनात... खरीप हातचा गेला... अशी दयनीय स्थिती आहे खेड तालुक्याच्या वाडा मंडल कार्यक्षेत्राची. त्यामुळे शेतकऱ्यांची एकमुखाने ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.


वाडा मंडल कार्यक्षेत्रातील वाडा, गुंडाळवाडी, बुरसेवाडी, कडधे, कान्हेवाडी, कमान, चास, पापळवाडी, आखरवाडी चास व परिसरातील अनेक गावांमध्ये मे महिन्यापासून सलगपणे पाऊस सुरू आहे. अजूनही पाऊस कोसळतोच आहे. या पावसाने उन्हाळी हंगामातील बाजरीची पिके अजूनही शेतातच असून पिकापासून शून्य उत्पादन मिळणार आहे. खरीप हंगाम सुरू होऊन जवळपास दीड महिना होत आला तरी शेतीची कामे करता येत नसल्याचे चित्र असून सततच्या पावसाने शेतांमध्ये वापसा नाही. शेतांमध्ये प्रचंड प्रमाणात गवत उगलवलेले आहे. दरम्यान, बटाटा पिकाची लागवड रखडली आहे तर हंगामातील कांदा लागवडी उशिरा होणे शेतकऱ्यांना परवडणार नसल्याने खरीप हंगाम गेल्यात जमा आहे.


शेतातील दलदलीमुळे काम करणे अशक्य
शेतांमध्ये पाणी साचून राहत असल्याने दलदल तयार झाली आहे. सततच्या पावसाने पेरणी करता येत नसून आता जरी पाऊस थांबला तरी पंधरा दिवस शेतात दलदलीमुळे काम करणे शक्य होणार नाही. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार वाडा मंडळ कार्यक्षेत्रात खरिपाच्या केवळ दहा ते पंधरा टक्के पेरण्या झालेल्या आहेत.

पिकांची वाढ खुंटली
पेरण्या झालेल्या ठिकाणी बियाणे उगवलेले नाही, काही ठिकाणी पेरले पण पिकांची वाढ खुंटली आहे. पिके पिवळी पडली असून झालेली पेरणीही निरर्थक ठरली असल्याने या परिसरातील तसेच पापळवाडीतील नंदू शिंदे, गणेश घनवट, विठ्ठल गावडे, रामदास घनवट, अवधूत पवार, महादू पवार, राजेंद्र घनवट, शंकर घनवट यांसह अन्य शेतकऱ्यांनी शासनाने ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.

खरिपाची स्थिती चिंताजनक आहे. खरीप हातचा गेल्यात जमा आहे. शेतात उन्हाळी पिके उभी असून, काढणी करता येत नसल्याची स्थिती आहे. केवळ दहा ते पंधरा टक्के क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या झालेल्या असून बाकी पेरण्या रखडल्या आहेत. पेरण्या झालेल्या पिकांची स्थितीही चांगली नसून पिकांची वाढ खुंटलेली आहे. पावसाने सोयाबीनची वाढ होत नसून पिके पिवळी पडण्यास खुंटली आहे.
- संदीप आहेर, कृषी सहाय्यक अधिकारी

03607

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com