चास कमान धरणाचे पाचही दरवाजे बंद

चास कमान धरणाचे पाचही दरवाजे बंद

Published on

चास, ता. १० : ‘‘खेड तालुक्याच्या पश्चिम पट्यात पावसाचा जोर ओसरला असून, चास कमान धरणात होणारी पाण्याची आवक कमी झाल्याने धरणातून होणारा विसर्ग पूर्णपणे थांबवण्यात आला आहे. धरणाचे पाचही दरवाजे बंद केले आहेत. सध्या धरणात ९६.१४ टक्के म्हणजेच ८.२४ टीएमसी पाणीसाठा झाला आहे,’’ अशी माहिती धरण प्रशासनाच्या वतीने सहाय्यक अभियंता शुभम सुसूंद्रे यांच्याकडून देण्यात आली आहे.

यंदा वर्षी जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ होऊन धरणातील पाणीसाठा ८१ टक्के झाल्यावर खबरदारीचा उपाय म्हणून सात जुलै रोजी धरणाचे पाचपैकी तीन दरवाजे उघडून १८०० क्युसेकने विसर्ग भीमा नदीपात्रात करण्यात येत होता. तर ४०० क्यूसेक वेगाने वीजनिर्मितीनंतर अतीवाहकाव्दारे भीमा नदीपात्रात विसर्ग करण्यात येत होता. मात्र ११ जुलै रोजी धरणात येणारी पाण्याची आवक कमी झाल्याने धरणाचे उघडलेले तीनही दरवाजे बंद करण्यात आले. मात्र, वीजनिर्मितीनंतर अतिवाहकाव्दारे ४०० क्यूसेक वेगाने विसर्ग सुरूच होता. दरम्यान, २५ जुलै रोजी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पुन्हा पावसाचा जोर पुन्हा वाढल्याने धरणाचे चालू वर्षी पहिल्यांदाच पाचही दरवाजे उघडण्यात येऊन भीमा नदीपात्रात ३२५० क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. त्यानंतर २६ जुलै रोजी त्यामध्ये वाढ करून विसर्ग ७७८० पर्यंत वाढवण्यात आला तर २७ जुलै रोजी विसर्ग ९५२० करण्यात आला. मात्र, त्यानंतर पावसाचा जोर कमी झाल्याने टप्याटप्याने विसर्ग कमी करण्यात आला. धरणाच्या दरवाजाव्दारे दोन ऑगस्टरोजी होणारा विसर्ग पूर्णपणे बंद करून वीज निर्मितीनंतर आतिवाहकाव्दारे ४०० क्यूसेक विसर्ग सुरू होता. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पूर्णपणे पाऊस थांबलेला असल्याने धरणात होणारी आवक लक्षात घेता ९ ऑगष्ट रोजी अतिवाहकाव्दारे होणारा विसर्गही बंद केल्याने चास कमान धरणातून होणारा विसर्ग पूर्णपणे थांबवला असून धरणात सध्या ६.१४ टक्के म्हणजेच ८.२४ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

03710

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com