कळमोडी घाटातील रस्त्याचा भाग गेला वाहून

कळमोडी घाटातील रस्त्याचा भाग गेला वाहून

Published on

चास, ता. ५ ः रस्त्यावरचे व डोंगरावरून येणारे पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी साइड गटार नसल्याने कळमोडी (ता. खेड) घाटातील रस्त्यावरून पाणी वाहून साइडपट्टी व मुख्य रस्त्याचा अर्धा भाग वाहून गेला आहे. त्या रस्त्याखालीही भगदाड पडल्याने अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून खेडच्या पश्चिम पट्यात पावसाची संततधार सुरू असून, रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. शिरगाव- मोरोशी- धामणगाव- कळमोडी- चिखलगाव अशा मार्गस्थ होणाऱ्या मार्गावर कळमोडी घाटात एका अवघड वळणावर रस्त्याचा भाग पाणी जाण्यामुळे खचून भगदाड पडलेले आहे. या भगदाडाच्या खाली रस्त्याचा भराव वाहून गेल्याने मोठे वाहन गेल्यास संपूर्ण रस्ता खचण्याची शक्यता आहे. तसेच, ते वाहन जवळपास १५० ते २०० फूट दरीत कोसळण्याची शक्यता आहे. भगदाडाच्या बाजूला सर्वत्र गवत उगवले असून, वळणावर या भगदाडाचा अंदाज येत नाही. या रस्त्यावरून दुधाचे टॅंकर, एसटी बस व अन्य वाहणे मार्गस्थ होत असतात. या शिवाय कळमोडी धरणावर मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असल्याने तातडीने हे भगदाड न बुजविल्यास अनर्थ होण्याची शक्यता आहे. या बाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

03793

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com