पुणे
दाट धुक्यामुळे थंडीची चाहूल
चास, ता.७ : चास (ता. खेड) परिसरात मंगळवारी (ता.७) सकाळी पडलेल्या दाट धुक्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता. धुक्यामुळे थंडीची चाहूल लागली आहे, वातावरणात झालेल्या बदलामुळे या दाट धुक्यामध्ये सुर्योदयानंतर सूर्यालाही या धुक्यातून वाट काढताना अडथळा येत होता. मात्र, सकाळच्या गारव्यानंतर दुपारच्या सत्रात ऑक्टोबरच्या हिटची जाणीव होण्यास सुरुवात झाली आहे. कडक उन्हामुळे शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांची दमछाक होवू लागली असून महिलांच्या हातात छत्री तर पुरुषांच्या डोळ्यावर टोपी दिसू लागली आहे.
03939