एस.एस.सी. ॲप विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त
चास, ता. १५ : ‘‘तंत्रज्ञानाच्या नवीन युगात विद्यार्थ्यांना मोबाइलपासून लांब ठेवू शकत नाही, परंतु याच मोबाइलचा अभ्यासासाठी योग्य वापर केल्यास निश्चितच मुलांमध्ये अभ्यासाची गोडी वाढेल व गुणवत्ताही वाढेल. म्हणूनच मोबाइलच्या युगामध्ये एस. एम. सुपे मेमोरियल फाउंडेशनने तयार केलेले एस.एस.सी. मोबाइल ॲपचा वापर विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरेल,’’ असे प्रतिपादन अन्न, औषधी द्रव्य व विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांनी नागपूर येथे एका विशेष कार्यक्रमात केले.
दहावीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी एस. एम. सुपे मेमोरियल फाउंडेशनिर्मित एस.एस.सी. मोबाइल ॲपचे उद्घाटन मंत्री झिरवाळ यांच्या हस्ते नागपूर येथे झाले. त्यावेळी ते बोलत होत. यावेळी सुपे मेमोरियल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. संतोष सुपे, आमदार हिरामण खोसकर, डॉ. किरण लहामटे, आमश्या पाडवी, शिरीष नाईक व काशिनाथ पावरा, माजी आमदार सुनील भुसारा, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. मंगल सुपे, सामाजिक कार्यकर्ते सतीश लेंभे आदी उपस्थित होते.
या अॅपविषयी डॉ. संतोष सुपे यांनी सांगितले की, ॲप पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील १३० शाळा व आश्रम शाळा व हजारो विद्यार्थ्यांना वापरण्यासाठी विनामूल्य उपलब्ध करून दिलेले आहे. या ॲपमध्ये दहावीच्या मराठी, सेमी इंग्लिश, इंग्लिश व सी.बी.एस.सी. असे पर्याय उपलब्ध आहेत. ॲपमध्ये विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिका संच, मान्यवर शिक्षकांचे विषयवार व्हिडिओ मार्गदर्शन, विषयावर नोट्स, गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिका उपलब्ध आहेत. वेळेचे नियोजन, लेखन सराव, उत्तर पत्रिका लिहिण्याचं तंत्र, एकाग्रता, महत्त्वाच्या नोट्स कशा लक्षात ठेवायच्या, अभ्यासाचे नियोजन व परीक्षे विषयक महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचनांचा समावेश आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (ए.आय) अभ्यासात वापर यासंबंधी माहिती दिलेली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

