मृत्यूची बातमी समजल्यावर सर्वच निःशब्द

मृत्यूची बातमी समजल्यावर सर्वच निःशब्द

Published on

चास, ता. २८ : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूची बातमी समजताच वाडा (ता. खेड) येथे ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद पाळला. दादांच्या आठवणींना उजाळा देत शोकसभा घेतली. यावेळी सर्वपक्षीयांच्या वतीने आदरांजली
वाहण्यात आली. प्रचाराच्या गाड्यांचा धुरळा उडत असतानाच ही बातमी समजल्यावर सर्वच निःशब्द झाले.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांचा प्रचार सुरू झालेला असताना दादांच्या मृत्यूची बातमी समजताच वाडा-वाशेरे तसेच चास-कडूस गण व गटात सर्वच पक्षांनी आपला प्रचार बंद ठेवून दादांना आदरांजली वाहिली.
विमान अपघातात अजित पवार यांच्या मृत्यूची बातमी समजताच सकाळी चास, वाडा व परिसरात शोकाकूल वातावरण तयार झाले. राष्ट्रवादी पक्षासह विरोधी पक्षातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना शिंदे पक्षाच्या वतीने आपला प्रचार थांबवला. सर्वच ठिकाणी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी एकत्र येत शोकसभा घेतल्या.
वाडा ग्रामपंचायतीच्या प्रांगणात सरपंच रूपाली मोरे तसेच ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ व निवडणुकीतील उमेदवार यांसह शालेय विद्यार्थी यांनी एकत्र येत पवार यांच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली वाहिली.

04261

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com