चासच्या विद्यालयात रामन यांना अभिवादन

चासच्या विद्यालयात रामन यांना अभिवादन

Published on

चास, ता. २८ : ‘‘प्रकाश किरणांच्या मार्गात येणाऱ्या रेणूंमुळे त्याचे विचलन होऊन तरंगलांबीत बदल होतो. प्रकाशाच्या विकिरणाबाबत महत्त्वाचे संशोधन केल्याने डॉ. सी. व्ही. रामन यांना नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या नावानेच रामन इफेक्ट प्रसिद्ध आहे. त्यामुळेच हा दिवस सर्वत्र राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो.’’ असे मत जवाहर विद्यालयाचे मुख्याध्यापक किशोर जगताप यांनी चास (ता. खेड) येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले.
येथील रयत शिक्षण संस्थेच्या जवाहर विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक किशोर जगताप यांच्या हस्ते नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ डॉ. सी. व्ही. रामन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रसंगी सुनीता घेवडे, प्रतिमा कडलग, महेश सुरवसे, राकेश ठोकळ, कीर्ती गंभीर, दिलीप बेंडूरे, महेंद्र जोशी, कविता जोशी, दिनेश लाडके, कृष्णा राठोड, आशा राऊत, गीता बागल, स्वाती टाकळकर यांसह अन्य मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना सहशिक्षक महेश सुरवसे म्हणाले, ‘‘अलौकिक बुद्धिमत्तेचे सी. व्ही. रामन यांना बालवयातच विज्ञानाविषयी प्रचंड आवड होती. त्यांच्या संशोधनाने द्रव आणि वायू माध्यमातील प्रकाशाच्या विकिरणासंदर्भात महत्त्वाचे संशोधन करता आले.’’ या प्रसंगी संस्कृती घनवट, समृद्धी कोबल, समीक्षा आमले, भक्ती आंद्रे, तनिष्का नाईकरे या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन पूजा गाडेकर हिने तर काव्या शिंदे हिने आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com