डोंगरची ‘काळी मैना’ बाजारात येण्यास सज्ज

डोंगरची ‘काळी मैना’ बाजारात येण्यास सज्ज

Published on

चास, ता. १६ : खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील सह्याद्रीच्या डोंगररांगा हिरव्यागार, लालसर करवंदांनी बहरल्या आहेत. लवकरच करवंदे अर्थातच डोंगरची काळी मैना जिल्ह्यातील बाजारात दाखल होण्यास सज्ज झाल्याने आदिवासींचा उन्हाळ्यातील रानमेव्याच्या रूपातील उत्पन्नाचा स्रोत सुरू होणार आहे.
सह्याद्रीच्या डोंगररांगांनी हा परिसर व्यापलेला असून या डोंगरराशींमध्ये रानमेव्याचा अनमोल खजिना आहे. हा रानमेवा म्हणजे येथील आदिवासींच्या जीवनात उन्हाळ्यातील उत्पन्नाचा एक मुख्य स्रोत असतो. आंबा, जांभूळ आणि फणस यासह या डोंगरराशींत मुबलक प्रमाणात आढळणाऱ्या करवंदांच्या जाळ्या या सद्यःस्थितीत हिरव्यागार, लालसर फळांनी लगडल्या आहेत. काही वर्षांपूर्वी केवळ पिकलेल्या करवंदापासून उत्पन्नाचा मार्ग होता; मात्र आता कच्च्या करवंदांपासून लोणचे तसेच अन्य उपपदार्थांच्या निर्मितीमुळे कच्च्या करवंदांनाही शहरातून मोठी मागणी असल्याने उत्पन्नाचे मार्ग सुरू झाले आहेत. सध्या करवंदे काही भागात परिपक्व होण्यास सुरुवात झाली आहे. आदिवासींचा उन्हाळ्यातील रानमेव्याच्या रूपातील उत्पन्नाचा स्रोत लवकरच सुरू होणार आहे.


04392

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com