चासकमान क्षेत्रातील बंधाऱ्यांच्या कामाला गती

चासकमान क्षेत्रातील बंधाऱ्यांच्या कामाला गती
Published on

चास, ता. २८ : चासकमान आणि भामा आसखेड धरण क्षेत्रातील पूल कम बंधाऱ्यांचे तांत्रिक सर्वेक्षण तातडीने सुरू करण्याचे निर्देश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत. आमदार बाबाजी काळे यांच्या मागणीनंतर बंधाऱ्यांच्या निर्मितीच्या प्रक्रियेला आता गती मिळाली आहे.
धरण क्षेत्रात उन्हाळ्यात होणारी पाणीटंचाई दूर करण्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांनी बुडीत बंधाऱ्यांची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर आमदार काळे यांनी पाठपुरावा करून सप्टेंबर २०२५ मध्ये संभाव्य ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी करून घेतली होती. आता या प्रकल्पाच्या तांत्रिक सर्वेक्षणाचे आदेश मिळाल्याने कामाला वेग येणार आहे.
नवीन बंधाऱ्यांमुळे पाणीसाठा वाढून शेतीला फायदा होईलच, शिवाय गावांमधील दळणवळणही सुलभ होणार आहे. यामुळे स्थानिक नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडतील, असा विश्वास आमदार बाबाजी काळे यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, चासकमान धरणातून पाणी सोडल्यावर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाणीटंचाई होते. याबाबत पाणलोट क्षेत्रातील शेतकऱ्यांची गेली अनेक वर्षापासून बुडीत बंधाऱ्यांची मागणी आहे. याबाबत धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील गावांनी २५ मार्चरोजी राजगुरूनगर येथे मोर्चाही काढला होता.
पूल कम बंधाऱ्यांमुळे एका बाजूला पाणीसाठा वाढून शेतीला मोठा दिलासा मिळणार आहे तर दुसऱ्या बाजूला गावांमधील दळणवळण सुलभ होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com