

खोडद, ता. २८ : मांजरवाडी, हिवरे खोडद व परिसरातील अनेक गावांमध्ये बिबट्यांचा मुक्त संचार वाढला आहे. बिबट्यांचे आता दिवसाही दर्शन होत आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. महावितरण कंपनीने रात्रीच्या ऐवजी दिवसा थ्री फेज वीजपुरवठा करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
जुन्नर तालुक्याचा पूर्व भागातील रात्रीचे भारनियमन पूर्णपणे रद्द करून दिवसा थ्री फेज वीजपुरवठा करावा. यामुळे शेतकऱ्यांना रात्रीच्यावेळी शेतात जाण्याची वेळ येणार नाही. पर्यायाने बिबट्यांकडून होणारे मानवी हल्ले टाळण्यास मदत होईल, अशी मागणी साळवाडी येथील शेतकरी संभाजी काळे यांनी केली आहे.
बिबट्यांकडून मानव तसेच पशुधनावर मोठ्या प्रमाणात हल्ले होत आहेत. ऊसतोडीमुळे बिबट्यांचे लपन क्षेत्र कमी झाले आहे. यामुळे त्यांचा संचार वाढला आहे. सध्या रात्री थ्री फेज वीजपुरवठा असतो. यामुळे शेतकऱ्यांना रात्री पाणी देण्यासाठी तसेच इतर कामांसाठी शेतात जावे लागते. यावेळी बिबट्यांच्या भीतीमुळे काम कठीण बनले आहे.
मांजरवाडी, हिवरेतर्फे नारायणगाव, खोडद, भोरवाडी, साळवाडी या गावांसह पूर्वेकडील अनेक गावांमध्ये बिबट्यांची संख्या वाढली आहे. वनविभागाने या बिबट्यांचा बंदोबस्त करावा. शेतीच्या कामांसाठी थ्री फेज वीजपुरवठा रात्री ऐवजी दिवसा करावा.
- संभाजी काळे, शेतकरी, साळवाडी
00259
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.