हिवरे येथे मेंढीचा बिबड्याकडून फडशा

हिवरे येथे मेंढीचा बिबड्याकडून फडशा

खोडद, ता.१२ : हिवरेतर्फे नारायणगाव येथील (ता.जुन्नर) देवाची जाळी मळ्यात मेंढ्यांच्या वाड्यावर बिबट्याने हल्ला केला व एका मेंढीचा फडशा पाडला. ही घटना भीमा करगळ यांच्या वाड्यावर शनिवारी (ता.११) सायंकाळी घडली.

घटनेची माहिती मिळताच वनपाल अनिता होले, वनरक्षक ज्ञानेश्वर पवार, वन कर्मचारी खंडू भुजबळ यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली व घटनेचा पंचनामा केला. जुन्नर तालुक्यात सध्या बिबट्यांकडून मानवी हल्ल्यांच्या घटना घडत आहेत.या पार्श्वभूमीवर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आपदा मित्र सुशांत भुजबळ, आपदा मित्र भरत मुठे, वनकर्मचारी खंडू भुजबळ यांनी या ठिकाणी तत्काळ पिंजरा लावला आहे.

दरम्यान, मेंढपाळ बांधवांनी लहान मुलांसह उघड्यावर झोपू नये. झोपताना स्वतःभोवती जाळी लावावी. शेतात काम करताना हातात काठी ठेवावी, खाली वाकून शेतात काम करू नये, असे आवाहन जुन्नरचे वनपरिक्षेत्राधिकारी प्रदीप चव्हाण यांनी केले आहे.


00659

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com