कोल्हे यांनी घेतल्या कार्यकर्त्यांच्या भेटी

कोल्हे यांनी घेतल्या कार्यकर्त्यांच्या भेटी

खोडद, : शिरूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी मतदानाच्या दिवशी सोमवारी (ता.१३) सकाळी मतदारसंघातील महत्वाची गावे तसेच शहरी भागांतील कार्यकर्त्यांना भेटी दिल्या व मतदारांना भेटून त्यांच्याशी संवाद साधला.

डॉ. कोल्हे यांनी त्यांच्या सोमवारी सकाळी घरी बांधलेल्या सप्तधेनू मंदिरातील गायींचे पूजन करून दर्शन घेतले व नंतर मातोश्री श्रीमती रंजना रामसिंग कोल्हे यांचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी सकाळी साडे आठ वाजता नारायणगाव येथील कोल्हे मळा येथील मतदान केंद्रावर जाऊन सर्व कुटुंबीयांसह मतदानाचा हक्क बजावला. यानंतर डॉ. कोल्हे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह वारूळवाडी, जुन्नर, नारायणगाव, मंचर, भोसरी आणि हडपसर असे दौरे करत कार्यकर्ते व मतदारांशी थेट संवाद साधला. मतदार संघातील मोठी गावे असलेल्या नारायणगाव, जुन्नर, मंचर, राजगुरुनगर, चाकण, भोसरी व हडपसर येथे होत असलेल्या मतदानाविषयी माहिती जाणून घेतली.

कार्यकर्त्यांकडून घेतली टक्केवारी जाणून
डॉ. कोल्हे यांनी भेटी दौऱ्याच्या दरम्यान अनेक ठिकाणी त्यांनी एकूण झालेले मतदान आणि मतदानाची टक्केवारी कार्यकर्त्यांकडून जाणून घेतली.यावेळी त्यांनी महिला भगिनी मतदार व नवमतदारांशी देखील संवाद साधून त्यांनी पहिल्यांदाच केलेल्या मतदानाचा अनपेक्षित अनुभव जाणून घेतला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com