मधूर कलिंगडामुळे वाढली तीन लाखांची ‘मेलोडी’

मधूर कलिंगडामुळे वाढली तीन लाखांची ‘मेलोडी’

खोडद, ता. १५ : मांजरवाडी (ता.जुन्नर) येथील शेतकरी बाळासाहेब मुळे यांनी कलिंगडाच्या उत्पादनातून तीन लाखांचा निव्वळ नफा मिळवला आहे. त्यांनी अवघ्या सव्वा एकर क्षेत्रात लागवड करून ५८ दिवसांत यशस्वी उत्पादन घेतले आहे. विविध ठिकाणी ३४ टन कलिंगडाची विक्री करून फायद्याची शेती करून दाखविली आहे.

बाळासाहेब सहदेव मुळे यांनी सव्वा एकर क्षेत्रात मेलोडी प्रजातीच्या कलिंगडाची लागवड केली होती. कलिंगडाची लागवड केल्यापासून ५८ व्या दिवशी कलिंगड निघाले.जमिनीच्या मशागतीपासून ते रोपांची लागवड करण्यापर्यंत आणि कलिंगड काढण्यापर्यंत सुमारे ८० हजार रुपये खर्च या पिकासाठी आला.एकूण ३४ टन कलिंगड निघाले.१२ रुपये प्रतिकिलो प्रमाणे या कलिंगडांची विक्री करण्यात आली.


सव्वा एकर क्षेत्रामध्ये तीन ट्रॉली शेणखत टाकून नंतर बेसल डोस दिला होता. कलिंगडासाठी मल्चिंग पेपरचा वापर करून ठिबक सिंचन करण्यात आले होते. दरम्यान, मांजरवाडी येथील साई कृषी सेवा केंद्राचे संचालक व शेतीतज्ञ रवींद्र थोरात यांनी या कलिंगडाचे पिकासाठी बाळासाहेब मुळे यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले.

कलिंगडाच्या विक्रीतून चार लाख रुपये मिळाले. त्यातून खर्च ८० हजार रुपये आणि कलिंगड काढण्याची मजुरी २० हजार रुपये असा एकूण १ लाख रुपये खर्च झाला व तीन लाख रुपयांचा निव्वळ नफा केवळ ५८ दिवसांत या शेतकऱ्याला मिळाला.
- बाळासाहेब मुळे

अशी घेतली काळजी
- किडींसाठी थ्रिप्स मावा तुडतुडे व आळीसाठी फवारणी
- भुरी व डाऊनी मिलडूसाठी गरजेप्रमाणे फवारणी घेतल्या.
- फळमाशीसाठी चिकट सापळे लावले.
- मायक्रो न्यूट्रियन्स, सल्फर, वॉटर सोल्यीबल या खतांचा वापर

00677

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com