मांजरवाडी खत व्यवस्थापनामुळे ३५ गुंठ्यांत ९६ टन ऊस
खोडद, ता. १४ : योग्य खतांचा वापर करून आणि योग्य व्यवस्थापनामुळे मांजरवाडी (ता.जुन्नर) येथील शेतकरी रवींद्र थोरात यांनी अवघ्या ३५ गुंठे क्षेत्रात ९६ टन उसाचे उत्पादन घेतले आहे. थोरात यांनी हलक्या जमिनीत यश एकात्मिक खत व मायक्रो न्यूट्रियन्स एनपीकेचा योग्य वापर करून उसाचे हे भरघोस उत्पादन घेतले आहे.
शेतकरी रवींद्र थोरात यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून १० जुलै २०२३ रोजी उसाच्या ८६०३२ या वाणाची सहा हजार रोपांची लागवड केली. लागवडीपूर्वी त्यांनी शेतात पाच ट्रॉली शेणखत, पाच गोणी सुपर फॉस्फेट टाकले. त्यामुळे या वाणाला सुमारे ३० ते ४० कांडी ऊस बहरला. परिसरात थोरात यांच्या ऊस पिकाचे मोठे कौतुक होत आहे. मांजरवाडी येथील बेलशेत मळा येथे रवींद्र थोरात यांची शेती आहे.
सध्या त्यांच्या शेतीमध्ये केळी, ऊस, कांदा, बटाटा व तरकारी पिके घेतली जात आहेत. ऊस पिकाच्या लागवडीनंतर दहा दिवसांनी पहिली आळवणी युरिया चार किलो अधिक १२६१०० चार किलो, त्यानंतर दुसरी आळवणी वीस दिवसांनी घेतली. बड शूटर लायकोसिन १२६१०० युरिया यांची एकत्रित आळवणी घेतली. त्यामुळे रोपामधून आठ ते बारा जोमदार फुटवे निघाले आहेत. लागणीनंतर चाळीस दिवसांनी संजीवक अधिक, मालवीनाल अधिक, सरप्लसची फवारणी घेतली. त्यानंतर खोडकीडा व तांबेरासाठी योग्य ती काळजी घेतली. तीन महिन्यांनी उसाची सरी फोडण्यात आली. सरी फोडणीसाठी १०:२६:२६ च्या तीन गोणी युरिया, दोन गोणी आयजीएल, मेरा कॉम्प्लेक्स २५ किलो मायक्रो न्यूट्रियन्स, २० किलो सल्फामॅक्स २० किलो देऊन सरी फोडण्यात आली. त्यानंतर भर लावून घेतली. फवारणीतून, ड्रिपमधून १९:१९:१९, १२६१००, ५२३४००, ००००५०, पोटॅशियम सोनाईट, मायक्रोन्यूट्रियन्स, संजीवके यांची फवारणी योग्य वेळी घेतली. या सर्वांचा परिणाम होऊन सर्व फुटव्यांची एक समान वाढ होऊन त्याचे उसात रूपांतर झाले. त्यामुळे प्रत्येक बुंध्यातून एकसमान कांडी असणारे ऊस निघाले आहेत. रवींद्र थोरात यांच्या उसाची १७ महिन्यानंतर ऊसतोड झाली आहे. ऊसतोड सुरू असताना सचिन काळे, बढे यांनी त्यांच्या ऊस शेतीला भेटी दिल्या आहेत. त्यांचे बंधू संजय थोरात यांचे त्यांना सहकार्य लाभले. थोरात यांना ३५ गुंठ्यांमधील ऊस पिकासाठी सुमारे ८० हजार रुपये खर्च आला असून खर्च जाऊन सुमारे सव्वादोन लाख रुपये शिल्लक राहिले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

