नगदवाडी कांदळीतील सुधन गूळ उद्योगाचे कौतुक

नगदवाडी कांदळीतील सुधन गूळ उद्योगाचे कौतुक

Published on

खोडद, ता.२० : नगदवाडी कांदळी (ता. जुन्नर) येथील सुधन गूळ उद्योग समूह बिहारचे शुगर केन इंडस्ट्री डिपार्टमेंटचे सचिव बी. आर. कार्तिकीय धांजी व त्यांच्या पथकाने नुकतीच भेट दिली. अभ्यास दौऱ्यात ऊस तोडणी, रस काढणे, प्रक्रिया करून गूळ बनवणे तसेच रसायनविरहित प्रक्रिया समजावून घेतल्याची माहिती उद्योग समूहाचे संचालक संकेत बढे यांनी दिली. ऊस समजावून घेतली.

यावेळी सचिव बी. आर. कार्तिकीय धांजी यांचे समवेत बिहार सरकारचे सहाय्यक साखर आयुक्त वेदव्रत कुमार, मांजरी येथील वसंतदादा शुगर इंडस्ट्रीज वरिष्ठ शास्त्रज्ञ जे. एम. रेपाळे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक नितीन शिंदे, जनमंगल पतसंस्थेचे अध्यक्ष सचिन वाळुंज, वडगाव आनंदचे माजी सरपंच प्रदीप देवकर, जुन्नर तालुका खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष अशोक बढे, नगदवाडी सोसायटीचे अध्यक्ष सुरेश बढे, कांदळी ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच सुदर्शन बढे, नंदा बढे, रवींद्र बढे, सिद्धार्थ बढे, संदेश बढे, अक्षय बढे, संभाजी शेंडे, धीरज बढे, सिद्धेश बढे, स्विकार बढे, सोनल बढे, माया बढे, संजय बढे, स्वाती बढे, सुप्रिया बढे, स्वप्नील बढे, सौरभ बढे, अल्पेश बढे, साई बढे, प्रसाद शेंडे, लीलाबाई बढे, यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

यावेळी धांजी यांनी बोलताना सुधन गूळ उद्योगाची प्रशंसा केली व येथील स्वच्छता व प्रक्रियेबद्दल कौतुक केले. या अभ्यास दौऱ्यात या टीमने ऊस उत्पादक, ऊस तोडणी, ऊस वाहतूक, रस काढणे, प्रक्रिया करून गूळ बनवणे, पॅकिंग करणे, विक्री करणे ही संपूर्ण प्रक्रिया समजून घेतली व बिहारमध्ये गूळ इंडस्ट्री वाढविणे, शेतकऱ्यांचे ऊस उत्पादन व साखर उतारा वाढवण्यासाठी सुधन गूळ उद्योग नगदवाडी व वसंतदादा शुगर इंडस्ट्रीज मांजरी यांची मदत घेण्याचे ठरविले.

सुधन गूळ उद्योग हा अतिशय अल्पावधीत ग्राहकांच्या पसंतीस उतरलेला गूळ आहे. नैसर्गिकरित्या केमिकल विरहित गुळाचे उत्पादन केले जात असल्याने या गुळाला बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. बिहार सरकारचे अभ्यास दौऱ्यासाठी सुधन गूळ उद्योगाची निवड केली ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.
- संकेत बढे, संचालक, सुधन गूळ उद्योग.
0136

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com