जीएमआरटी नोकर भरती प्रक्रियेत
पारदर्शीपणा जपला जाईल : गुप्ता

जीएमआरटी नोकर भरती प्रक्रियेत पारदर्शीपणा जपला जाईल : गुप्ता

Published on

खोडद, ता. ३ : ‘‘जीएमआरटी नोकर भरती प्रक्रियेबाबत खोडद येथील ग्रामस्थांनी केलेल्या मागण्यांची अणुऊर्जा संचालनालय (डीएइ) कार्यालयाला माहिती देऊन सध्याची नोकर भरती प्रक्रिया थांबविण्यासाठी अभिप्राय मागवला जाईल. वरिष्ठ कार्यालयाच्या परवानगीने पुढील सर्व प्रक्रियेत पारदर्शीपणा जपला जाईल,’’ असे आश्वासन जीएमआरटीचे केंद्र संचालक प्रा. यशवंत गुप्ता यांनी गुरुवारी (ता. ३) ग्रामस्थांना दिले.
खोडद (ता. जुन्नर) येथे जीएमआरटी हा रेडिओ दुर्बीण प्रकल्प आहे. नोकर भरतीविषयी प्रसिद्ध झालेल्या या जाहिरातीनुसार जीएमआरटी आणि एनसीआरएमध्ये नुकतीच विविध ३८ पदांसाठी नोकर भरती प्रक्रिया पार पडली. गावातील स्थानिक उमेदवारांनी व ग्रामस्थांनी या उमेदवार निवड प्रक्रियेबाबत आक्षेप घेतला होता. या प्रकाराबाबत ग्रामस्थांनी मंगळवारी (ता. १) निषेध केला होता. बुधवारी ग्रामस्थांनी जीएमआरटी प्रशासनाला याबाबत विविध मागण्यांचे निवेदन दिले होते.
गुरुवारी दुपारी ग्रामपंचायत सभागृहात जीएमआरटीचे केंद्र संचालक प्रा. गुप्ता, प्रशासकीय अधिकारी अभिजित जोंधळे यांची आणि ग्रामस्थांची बैठक झाली. यावेळी नारायणगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक महादेव शेलार यांनी ग्रामस्थ आणि जीएमआरटी प्रशासन यांच्यात समन्वय साधण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.
यावेळी सरपंच मनिषा गुळवे, उपसरपंच शुभांगी काळे उपस्थित होते. याप्रसंगी प्रा. राधाकृष्ण गायकवाड, इंद्रभान गायकवाड, शिवाजी खरमाळे, जालिंदर डोंगरे, योगेश शिंदे, नवनाथ पोखरकर, संतोष काळे, पंकज कुचिक आदींनी चर्चेत सहभाग घेतला.
अणुऊर्जा संचालनालयाच्या अंतर्गत येणाऱ्या तमिळनाडू आणि गुजरातमधील अणुऊर्जा केंद्रांमुळे बाधित झालेल्या भूमिपुत्र शेतकऱ्यांना
न्याय देण्यासाठी त्यांनी केलेल्या २० टक्के अधिकच्या गुणाधीभारामुळे, तसेच प्रकल्पासाठी जमीन गेलेल्या स्थानिकांना नोकरीत प्रथम, तालुक्यातील उमेदवारांना द्वितीय प्राधान्य देण्याची तरतूद केली आहे. याप्रमाणे जीएमआरटीच्या नोकरभरतीमध्ये या सूत्रांचा वापर करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. यावेळी जालिंदर डोंगरे यांनी आभार मानले.

जीएमआरटी प्रकल्पासाठी खोडद ग्रामस्थांनी दिलेले योगदान मोठे आहे. नोकर भरती प्रक्रियेत स्थानिकांना न्याय देण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करू. ग्रामस्थांनी केलेल्या मागण्यांचे समाधानकारक उत्तर देऊन सध्याच्या भरती प्रक्रियेविषयी चौकशी केली जाईल. खोडदच्या ग्रामस्थांना न्याय दिला जाईल.
- प्रा. यशवंत गुप्ता, केंद्र संचालक, जीएमआरटी प्रकल्प, खोडद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com