बिबट समस्येपुढे नागरिक कणखर

बिबट समस्येपुढे नागरिक कणखर

Published on

खोडद, ता.१३ : मागील २५ वर्षांपासून जुन्नर वनपरिक्षेत्रात मानव बिबट संघर्ष सुरू आहे. अलीकडच्या काळात हा संघर्ष शिगेला पोचला आहे. मात्र, या चारही तालुक्यातील नागरिक बिबट समस्येपुढे हतबल झाले नाही तर कणखर झाले आणि सध्या बिबट्यांसोबत सहजीवन जगत आहे. जुन्नर तालुक्यातील जनतेशी आणि बिबट्याशी माझी नाळ जोडली गेलेली आहे. या भावनेतूनच प्रत्येक बिबट हल्ला घटनेच्या वेळी मी नागरिकांमध्ये मिसळून जाऊन काम केले, असे प्रतिपादन जुन्नरचे मावळते उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी केले.

जुन्नर वनविभागाचे उपवनसंरक्षक सातपुते यांची बदली झाली असून, यानिमित्त जुन्नर वनविभागाने त्याचा निरोप समारंभ हिवरेतर्फे नारायणगाव (ता.जुन्नर) येथे आयोजित केला होता. यावेळी ते बोलत होते.

यावेळी डॉ. अर्चना सातपुते, पिंपरी चिंचवड महानगरपालिका मुख्य उद्यान अधीक्षक महेश गारगोटे, सहाय्यक वनसंरक्षक अजित शिंदे, चाकण वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष कंक, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण, इतिहास अभ्यासक विनायक खोत, विजय कोल्हे, डी.के.वळसे पाटील, रवींद्र पाटे, सुरेश वाणी, नवनाथ फलके, माणिकडोह बिबट निवारा केंद्राचे प्रकल्प अधिकारी महेंद्र ढोरे, अंबादास हांडे, शरद उकिर्डे, भानुदास शिंदे, तृप्ती बोरसे, कीर्ती चिचमलकर, मनिषा काळे, वनपाल फापाळे, नितीन विधाटे, रूपेश जगताप यांनी आपल्या भाषणांतून सातपुते यांच्या कार्यपद्धतीचा गौरव केला. जुन्नर वनविभागाच्यावतीने सातपुते यांना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आणि गणेश मूर्ती भेट देण्यात आली.

बिबटे पकडण्यासाठी लावले २५० पिंजरे उपलब्ध केले. दोन वर्षे पाठपुरावा करून माणिकडोह बिबट निवारा केंद्राच्या विस्तारीकरणासाठी साडे बारा हेक्टर जागा मिळवली.किल्ले शिवनेरीवर प्लास्टिक बंदी केली, प्लास्टिक बंदी केलेला किल्ले शिवनेरी हा महाराष्ट्रातला पहिला किल्ला आहे. तरुणांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी गाइड प्रशिक्षण दिले, अशी इतर अनेक कामे सातपुते यांनी केली आहे.

मनीषा काळे यांनी सुमधूर आवाजात शिवरायांची आरती सादर करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रस्ताविक अमृत शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन लक्ष्मण दातखिळे व ऐश्वर्या चासकर यांनी केले. आभार घोडेगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी कुणाल लिमकर यांनी मानले.


01471

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com