शिक्षकांच्या बदल्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला बाधक

शिक्षकांच्या बदल्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला बाधक

Published on

खोडद, ता. १८ : ‘‘सध्या संपूर्ण राज्यात जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या सुरू आहेत. नुकत्याच संवर्ग एक शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या पार पडल्या असून उर्वरित शिक्षकांच्या बदल्या सुरू आहेत, मात्र शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याने आता मध्यावधी शिक्षकांच्या बदल्या केल्या तर विद्यार्थी गुणवत्तेवर परिणाम होऊन विद्यार्थ्यांचे नुकसान होणार असल्याने या बदल्या थांबवा,’’ अशी मागणी पालक वर्गातून जोर धरू लागली आहे.
शिक्षकांच्या बदल्या या मे महिन्यात पूर्ण होत असतात, परंतु यंदा शाळा सुरू होऊनही ही प्रक्रीया पूर्ण झाली नाही. आता शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली असून विद्यार्थी आपल्या शिक्षकांशी समरस झाले आहेत, तर शिक्षकांनीदेखील गुणवत्तेचे वार्षिक नियोजन केले असताना शासनाच्यावतीने बदल्यांची प्रक्रिया सुरू झाली असल्याने शिक्षकांमधून नाराजीचा सूर निघत आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात पुणे जिल्हा शिष्यवृत्तीमध्ये प्रथम आहे. अनेक पाचवीच्या शिक्षकांनी वर्गाचे जादा तास किंवा विद्यार्थी गुणवत्ता यादीत येण्यासाठी नियोजन केले असताना त्यांना आता बदलीमुळे मध्येच वर्ग सोडावा लागणार असल्याने त्या विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमध्ये मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख यांची पदे रिक्त आहेत. ती पदे पदोन्नतीने एका बाजूला भरली जात नाहीत, तर दुसरीकडे शिक्षकांच्या अचानक होणाऱ्या बदल्यांमुळे जिल्हा परिषद शाळांच्या गुणवत्तेवर दुष्परिणाम होणार आहे. बदल्यांपूर्वी पदोन्नती झाली असती तर शिक्षकांच्या रिक्त जागा लक्षात येऊन त्यानुसार त्या भरता येणे शक्य होते. आता बदलीनंतर पदोन्नती घेतली तर अनेक शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त राहणार असून परिणामी गुणवता घसरेल. त्यामुळे यंदा बदल्या तूर्तास तरी थांबवाव्यात, असे शिक्षकांचे मत आहे.

सध्या शिक्षकांमध्ये बदल्यांचीच चर्चा असल्याने अनावधानाने विद्यार्थ्यांच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होत आहे. शिक्षकांवर बदलीची टांगती तलवार असून त्यामुळे गुणवत्ता आणखी ढासळणार आहे. पुणे जिल्ह्यात एकूण ४ हजार ५०० शिक्षकांच्या बदल्या होणार असून ८८४ शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या झाल्या आहेत.

तालुकानिहाय बदल्या झालेल्या शिक्षकांची संख्या :
तालुका बदल्या झालेले शिक्षक
जुन्नर - ७८
आंबेगाव - ४७
बारामती - १०१
भोर - ६०
पुरंदर - ५५
इंदापूर - ९०
हवेली - २३
वेल्हे- ३७
आंबेगाव - ४७
शिरूर - १०५
मुळशी - ४३
मावळ - ६१
खेड- १२८

शिक्षकांची बदली प्रक्रिया ही शासकीय बाब असली तरी या बदल्या यापूर्वीच होणे अपेक्षित होते. अचानक झालेल्या या बदल्यांमुळे शिक्षकांच्या कामावर परिणाम होणार असून त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत दिसून येणार आहे, या बदल्या ताबडतोब थांबवाव्यात.’’
- माऊली खंडागळे, संचालक, जुन्नर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com