हिवरेतील वीजपुरवठा सुरळीत

हिवरेतील वीजपुरवठा सुरळीत

Published on

खोडद, ता.१६ : नारायणगाव केंद्रातून हिवरेतर्फे नारायणगाव येथील उपकेंद्रात जाणारी ३३ केव्हीची जमिनीखालील एसटी केबल जळाल्याने शुक्रवारी (ता.१५) रात्री दीडपासून हिवरे व परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. मात्र, वीजवितरणच्या कर्मचाऱ्यांनी रात्रीपासूनच केबलची दुरुस्ती केली व शनिवारी (ता.१६) सकाळी ९:३० च्या सुमारास वीजपुरवठा सुरळीत झाला.
हिवरे येथील शिवहरीनगरमधील यांच्या राजेंद्र खोकराळे यांच्या घरासमोर ३३ केव्ही (अंडरग्राउंड) केबल जळाली होती. सहाय्यक अभियंता एन.आर. मुठेकर, वरिष्ठ तंत्रज्ञ दादासाहेब कांबळे, बब्रुवान गायकवाड, शीलरत्न भवरे, सहकर्मचारी संदीप मुळे, अजित थोरात, रवींद्र आढारी यांनी शिवहरीनगर येथे येऊन केबलची दुरुस्ती केली.
केबल जळाल्यानंतर हिवरे गावठाण, शिवहरीनगर, सातपुडा, कोरपडमळा, खोडद, मांजरवाडी या गावांतील सगळाच वीजपुरवठा बंद होता. मात्र, ज्या ठिकाणी केबल जळाली होती केवळ तेवढ्याच भागात वीजपुरवठा बंद करून खोडद, मांजरवाडी, जाधववाडी, कळमजाई या परिसरात सिंगल फेज सुरू ठेवण्यात आली होती.
01512

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com