श्री अंबिका पतसंस्थेचा १५ टक्के लाभांश

श्री अंबिका पतसंस्थेचा १५ टक्के लाभांश

Published on

खोडद, ता. २७ : जुन्नर तालुक्यातील श्री अंबिका ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेकडून सभासदांना १५ टक्के लाभांश जाहीर करण्यात आला आहे. खोडद (ता. जुन्नर) येथे मुक्ताबाई सांस्कृतिक भवनमध्ये नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला.
सभेपुढील १५ विषयांवर गंगाराम पानमंद विजय मुनोत, निवृत्ती थोरात, पंढरीनाथ तांबे, कृष्णाजी गायकवाड, चंद्रकांत पोखरकर, शरद पोखरकर, दत्तात्रेय ग. गायकवाड यांनी चर्चेत सहभाग घेतला. सभासदांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर संस्थेचे माजी अध्यक्ष संतोष गायकवाड, माजी उपाध्यक्ष संतोष पटाडे यांनी समर्पक उत्तरे दिली. सर्व ठराव बहुमताने संमत केले.
रोहिदास गायकवाड यांनी संस्थेच्या आर्थिक सद्यःस्थितीची माहिती दिली. यावेळी पतसंस्थेचे उपाध्यक्ष सुरेश खरमाळे, सचिव दिलीप गायकवाड, माजी अध्यक्ष शैलेश गायकवाड, संचालक प्रकाश गायकवाड, संदीप गुळवे, सर्जेराव कुचिक, ज्ञानेश्वर गायकवाड, विश्वास घंगाळे, शंकर शिंगोटे, मच्छिंद्र पोखरकर, बजरंग खरमाळे, संचालिका सीमा थोरात, संगीता गायकवाड, विद्या गायकवाड, संस्थेचे सल्लागार कुंडलिक गायकवाड, दिगंबर खरमाळे, अंकुश गायकवाड, शशिकांत थोरात, अशोक खरमाळे, रमेश खरमाळे, कैलास गायकवाड, शिवराम पोखरकर, सरपंच मनीषा गुळवे, उपसरपंच शुभांगी काळे, बाळासाहेब शिंदे, वैधानिक लेखापरीक्षक राजनकुमार काळसेकर, आर. आर. पिंगळे उपस्थित होते.
दरम्यान, राज्य सहकारी संघाचे प्रा. अशोक केदारी यांनी मार्गदर्शन केले. जुन्नर तालुका पतसंस्था फेडरेशनचे संचालक शैलेश गायकवाड, संस्थेचे सल्लागार रमेश पंढरीनाथ खरमाळे, वनरक्षक रमेश खरमाळे, जालिंदर कोरडे यांचा यावेळी सन्मान केला.
अहवाल सालात दिगवंत व्यक्तींना संस्थेचे सल्लागार जालिंदर डोंगरे यांनी श्रद्धांजली अर्पण केली. मागील सभेचा सभावृतांत वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र गायकर यांनी केले. शिवाजी खरमाळे यांनी प्रास्ताविक केले. सभेपुढील विषयांचे वाचन व सूत्रसंचालन संतोष पटाडे यांनी केले. विठ्ठल पानमंद यांनी आभार मानले.

संस्थेची उलाढाल
महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र असलेल्या श्री अंबिका पतसंस्थेच्या खोडद, मांजरवाडी, नारायणगाव, पारगाव (शिंगवे), चांडोली बुद्रुक, सुलतानपूर (शिरोली), घोडेगाव, महाळुंगे पडवळ, जांबूत, अशा ९ शाखा व मुख्यालय आहे. संस्थेच्या ठेवी १९० कोटी ७८ लाख रुपये आहेत. कर्ज १४१ कोटी ७४ लाख रुपये, वसूल भागभांडवल १० कोटी १५ लाख रुपये, निधी ९ कोटी ९४ लाख रुपये, गुंतवणूक ७९ कोटी ३० लाख रुपये व नफा २ कोटी ३५ लाख रुपये आहे. संस्थेचे १५ हजार ८०८ सभासद आहेत. संस्थेने २००० रुपयांवरील भाग धारण करणाऱ्या सभासदांचा ३ लाख रुपयांचा अपघात विमा उतरविला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com