जीएमआरटी प्रकल्पाच्या 
आवारात दोन पिंजरे

जीएमआरटी प्रकल्पाच्या आवारात दोन पिंजरे

Published on

खोडद, ता. २४ : खोडद (ता. जुन्नर) येथील जीएमआरटी प्रकल्पाच्या आवारात असलेल्या बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी जुन्नर वनविभागाने सोमवारी (ता. २३) व मंगळवारी (ता. २४) दोन पिंजरे लावले असल्याची माहिती ओतूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी चैतन्य कांबळे यांनी दिली.
यापूर्वी येथील जीएमआरटी प्रकल्पाच्या क्षेत्रात चार बिबटे वनविभागाने पकडले आहेत. या परिसरात आणखी बिबट असल्याची तक्रार जीएमआरटी प्रशासनाने वनविभागाकडे केली होती. चार बिबटे पकडल्यानंतरही या परिसरात अद्यापही बिबट्यांचा वावर असल्याने भिती व्यक्त केली जात आहे. शनिवारी (ता. २१) सायंकाळी याच परिसरात एका ठिकाणी सुमारे ५ ते ६ वर्षांच्या निवांत बसलेल्या बिबट्याचे दर्शन झाले. यापूर्वी येथे १३ डिसेंबर रोजी एक, ३ जानेवारी रोजी एक, १० फेब्रुवारी रोजी एक, तर १८ फेब्रुवारी रोजी एक असे चार बिबटे वनविभागाने पकडले होते. सोमवारी व मंगळवारी येथे वनरक्षक विशाल गुंड, शुभम भोर, बाळू वामन, रोशन भोर, संतोष कुतळ यांनी पिंजरे लावण्यासाठी मदत केली आहे. पिंजऱ्यात भक्ष म्हणून कोंबड्या ठेवण्यात आल्या आहेत.
शनिवारी (ता. २८) रविवारी (ता. १) या दोन दिवशी जागतिक विज्ञान दिनानिमित्त जीएमआरटी प्रकल्पाच्या आवारात विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. या दोन दिवसात येथे अनेक विद्यार्थी मोठ्या संख्येने या विज्ञान प्रदर्शनाला भेट देतात. या पार्श्वभूमीवर दक्षतेचा भाग म्हणून जीएमआरटी प्रकल्पाच्या आवारात बिबटे पकडण्यासाठी पिंजरे लावण्यात आल्याचे चैतन्य कांबळे यांनी सांगितले.

01985

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com