वळसेपाटील महाविद्यालयात ‘रोजगार- उद्योजकते’वर कार्यशाळा
खोडद, ता. ३ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आजीवन अध्ययन व विस्तार विभाग आणि निमगाव सावा (ता. जुन्नर) येथील श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित दिलीप वळसे पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने रोजगार आणि उद्योजकता या विषयावर आयोजित केलेली एकदिवसीय कार्यशाळा झाली.
या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना स्वावलंबन, उद्योगाची संधी तसेच आधुनिक व्यवसायाच्या कल्पना याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. प्रल्हाद शिंदे होते. प्रमुख वक्ते एस. एन. जी. कॉलेजचे डॉ. महावीर शेटीया यांनी विद्यार्थ्यांना आजच्या काळात नोकरीपेक्षा व्यवसायाचे महत्त्व, स्टार्टअप संधी, लघुउद्योग, तसेच ग्रामीण भागातील उद्योजकतेच्या संधी याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. प्रश्नोत्तर सत्रात विद्यार्थ्यांनी व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणाऱ्या भांडवल, नियोजन आणि कौशल्यांबाबत शंका विचारल्या, त्यांना डॉ. सचिन बिडवे यांनी मार्गदर्शन केले. सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी यांचे सहकार्य आणि विद्यार्थी यांच्या उपस्थितीत ही कार्यशाळा उत्साहात पार पडली.
सूत्रसंचालन प्रा. अनिल पडवळ यांनी केले. प्रास्ताविक आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे समन्वयक प्रा. सुभाष घोडे यांनी केले. प्रा. आकाश धुमाळ यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

