भोरवाडीत सोमवारपासून अखंड हरिनाम सप्ताह
खोडद, ता. २० : भोरवाडी (ता. जुन्नर) येथील हनुमान प्रासादिक मंडळ व कारभारी महाराज भोर यांच्या प्रेरणेने भोरवाडी (वडगाव कांदळी) येथे सोमवारी (ता. २३) ते शुक्रवारी (ता. २७) या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले आहे.
या कालावधीत रोज पहाटे ४ ते ६पर्यंत काकडा भजन, दुपारी ३ ते ४ भजन, सायंकाळी ५ ते ६पर्यंत हरिपाठ, सायंकाळी ७ ते ९ पर्यंत हरीकीर्तन, ९ ते १० महाप्रसाद व रात्री १०नंतर जागर असे कार्यक्रम होणार आहेत.
सोमवारी (ता. २३) हनुमान महाराज डांबे, मंगळवारी (ता. २४) नवनाथ महाराज माशेरे, बुधवारी (ता. २५) कावेरीताई घुमरे, गुरुवारी (ता. २६) सकाळी १० ते १२पर्यंत किसन महाराज काळे यांचे प्रभू श्रीराम जन्मोत्सवाचे किर्तन, दुपारी ३ ते ५ हळदी कुंकू आणि ५ ते ७ दिंडी सोहळा आयोजित केला आहे.
सायंकाळी ७ ते ९ नरेंद्र महाराज गुरव आणि शुक्रवारी (ता. २७) सकाळी १० ते १२ वाजता परशुराम महाराज अनर्थे यांचे काल्याचे कीर्तन होईल व त्यानंतर महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता होईल.

