

खोडद, ता. २६ : ‘‘महिलांचा आत्मविश्वास टिकवणे ही काळाची गरज असून, स्त्रियांनी पारंपरिक गुलामी मानसिकतेतून मुक्त होणे आवश्यक आहे,’’ असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखिका कुसुम अलाम यांनी निमगाव सावा (ता. जुन्नर) येथे केले.
येथील श्री पांडुरंग ग्रामीण प्रतिष्ठानच्या दिलीप वळसे पाटील महाविद्यालयात ‘महिला सक्षमीकरण- वर्तमान स्थिती, आव्हाने आणि संधी’ या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित केले होते. या प्रसंगी बीजभाषण करताना अलाम बोलत होत्या. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पांडुरंग पवार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी पवार यांच्या हस्ते परिसरातील उपक्रमशील महिलांचा सन्मानपत्र व ग्रंथ देऊन गौरव करण्यात आला.
चर्चासत्राचे उद्घाटक प्राचार्य डॉ. भास्कर शेळके यांनी पुरुषप्रधान मानसिकतेत बदल घडवण्याचे आवाहन केले, तर डॉ. सुनील शिंदे यांनी स्त्री शिक्षणातील जुन्नर तालुक्याचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित केले.
या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्या स्मिता कणसे, कमल शेळकंदे, प्रा. धनश्री कोळगे व मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक प्राचार्य प्रल्हाद शिंदे यांनी केले, तर कविता पवार यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.