

खोडद, ता. २७ : हिवरेतर्फे नारायणगाव (ता. जुन्नर) येथील मीना नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे संरक्षक कठडे तुटल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. जीवितहानी टाळण्यासाठी कुकडी प्रकल्प पाटबंधारे विभागाने या कठड्यांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
येथील मीना नदीवर ३० वर्षांपूर्वी बांधलेला हा बंधारा देवाचीजाळी, कळमजाई मळा, थोरात मळा आणि भोरवस्ती या भागांना अष्टविनायक महामार्गाशी जोडणारा मुख्य दुवा आहे. शेतमालाची वाहने, विद्यार्थी आणि नागरिकांची या मार्गावरून मोठी वर्दळ असते. सध्या बंधाऱ्याचे सुरुवातीचे कठडे व लोखंडी पाइप तुटले असून, मध्यभागातील सिमेंटचे कॉलमही एका बाजूला कलले आहेत.
बंधाऱ्यावरील रस्ता अरुंद असल्याने आणि सुरक्षेचा अभाव असल्याने मोठा अपघात होण्याची भीती आहे. जोपर्यंत दुरुस्ती होत नाही, तोपर्यंत अवजड वाहनांनी बंधाऱ्याचा वापर न करता नदीपात्रातून जावे, असे आवाहन सरपंच दिगंबर भोर यांनी केले आहे.
या ठिकाणी भेट देऊन पाहणी करू आणि संरक्षक कठडे दुरुस्तीचे काम सुरू करू. तोपर्यंत नागरिकांनी या बंधाऱ्याच्या रस्त्याचा वापर करू नये.
- गणेश शिनलकर, शाखाधिकारी, मीना सिंचन शाखा, नारायणगाव
02123
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.